Nashik : पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचारी सहा महिने मानधनाविना, थकीत मानधनासाठी १ जूनपासून कामबंद आंदोलन

नाशिक : राज्याच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत जिल्हा व तालुका स्तरावर कार्यरत कंत्राटी कर्मचारी पाणी व स्वच्छतेची कामे करत आहेत. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून मानधन प्रलंबित असल्याने महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता) कंत्राटी कर्मचारी संघटनेने राज्य सरकारकडे निवेदन सादर केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास १ जून २०२६ पासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे.


यासंदर्भातील निवेदन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Minister for Water Supply and Sanitation Gulabrao Patil) यांना देण्यात आले आहे.ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना, स्वच्छ भारत अभियान तसेच जल जीवन मिशन (Jal Jeevan Mission) यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी जिल्हा व तालुका स्तरावरील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून केली जाते. डिसेंबर २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीतील पाच महिन्यांचे मानधन अद्याप मिळालेले नाही. मे महिना संपत आला असून एकूण सहा महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने घरखर्च, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च आणि दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाल्याची व्यथा कर्मचाऱ्यांनी निवेदनातून मांडली आहे.



मानधनाबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही केवळ आश्वासने मिळाल्याचा आरोप संघटनेने केला आहे. शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, १ जूनपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये प्रलंबित संपूर्ण मानधन तात्काळ कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणे आणि मानधनाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढणे यांचा समावेश आहे. ३० मे २०२६ पर्यंत प्रश्न न सुटल्यास आंदोलन छेडण्यात येणार आहे.



आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात १ ते ५ जूनदरम्यान जिल्हा परिषद कार्यालयांसमोर (Nashik Zilla Parishad Office) धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ८ जून रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय (Jalgaon District Collector's Office) ते मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात मागण्या मान्य होईपर्यंत राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे. आंदोलनामुळे पाणी व स्वच्छता विभागाचे (Department of Water and Sanitation) विविध कामकाज ठप्प होण्याची शक्यता असून, त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीस शासन आणि प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात म्हटले आहे.

Comments
Add Comment

Nashik Crime : बसस्थानकातील चोऱ्यांचा पर्दाफाश ! 24 लाख 43 हजारांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त ; आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Nashik Crime : नाशिक शहरातील बसस्थानक परिसरात चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला गुन्हेशाखा युनिट क्रमांक १च्या पथकाने

Nashik Kumbh Mela : कुशावर्त तीर्थावर ३१ फूट उंच भव्य ध्वजस्तंभाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पूजन

Nashik Kumbh Mela : : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर नगरीतील कुशावर्त तीर्थ येथे ३१ फूट उंच भव्य

Nashik Crime : '...तर तुम्हालाही धर्मांतर करावे लागेल' कुटुंबियांना धमकी ; 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, धर्मांतरासाठी दबाव अन्... नाशिकमध्ये खळबळ

Nashik Crime : नाशिकमध्ये एक अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटक करून तिच्यावर

Nashik News : पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याची धमकी अन्... आर्थिक फसवणुकीतील फरार संशयिताला नाशिकरोडमध्ये अटक

Nashik News : आहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे दाखल असलेल्या आर्थिक फसवणुकीच्या आणि एमपीआयडी कायद्यांतर्गत

Nashik : उत्तर महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय ! स्वतंत्र ‘नाशिक टपाल क्षेत्रा’ला केंद्राची मंजुरी, मंत्री छगन भुजबळांच्या पाठपुराव्याला यश

नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील टपाल सेवांचे प्रशासन अधिक सक्षम आणि कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने

Nashik Kumbh Mela: कुंभमेळ्यात आखाड्यांचं महत्त्व काय? त्यांचं काम आणि त्या मागचं रहस्य काय? जाणून घ्या

आखाडा हा शब्द वाचला की पहिलं डोक्यात येते ती कुस्ती... कुस्तीसाठीच आखाडा हा शब्द प्रचलित आहे. मग कुंभमेळ्यात भाग