Ramai Awas Yojana : घर बांधायला पैसे नाहीत ? मग काळजी कशाला ? 'रमाई आवास' घरकुल योजना आहे ना !

Ramai Awas Yojana : राज्य सरकारने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘रमाई आवास (घरकुल) गृहनिर्माण योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध समाजातील शहरी आणि ग्रामीण भागातील बेघर व गरजू कुटुंबांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध भगिनींसाठी राज्य सरकारची रमाई आवास घरकुल योजना म्हणजे एक मोठा आधार ठरत आहे.


राज्यातील अनेक कुटुंबांकडे सुरक्षित निवारा नसल्यामुळे त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. ही समस्या दूर करण्यासाठी सरकारकडून ही मदत दिली जाते. तसेच, या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना क्षेत्रानुसार साधारणपणे १ ते २ लाखांपर्यंत गृहनिर्माण अनुदान मिळते. त्यामुळे घर बांधण्याचा खर्च कमी होतो आणि कुटुंबांना मजबूत व सुरक्षित घर उभारणे शक्य होते.



ग्रामीण भागात किती मदत मिळते ?


या योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी सरकार दोन लाखांपर्यंतची मदत करतं, पण त्यासाठी काही अटी आणि नियम नीट समजून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर तुम्हाला एक लाखापर्यंतची मदत मिळते आणि विशेष म्हणजे यामध्ये लाभार्थ्याला कोणतेही स्वतःचे पैसे भरावे लागत नाहीत.



शहरी भागात किती मदत मिळते ?


यामध्ये जर तुम्ही नगरपालिका क्षेत्रात राहत असाल तर दीड लाख रुपये आणि महानगरपालिका क्षेत्रात राहत असाल तर दोन लाख रुपयांची मदत मिळते, फक्त तिथे लाभार्थ्याला सात ते दहा टक्के हिस्सा स्वतःचा टाकावा लागतो.



योजनेसाठी पात्रता काय ?


आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यासाठी नक्की पात्र कोण आहे ? तर सगळ्यात आधी म्हणजे अर्जदार हा महाराष्ट्राचा १५ वर्षांपासूनचा रहिवासी असला पाहिजे. त्यानंतर तुमचं वार्षिक उत्पन्न जर ग्रामीण भागात १ लाख, नगरपालिकेत दीड लाख आणि मोठ्या शहरात २ लाखांच्या आत असेल, तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरता. याशिवाय तुमच्याकडे स्वतःची जागा असणं इथं खूप महत्त्वाचं आहे आणि तुमच्या कुटुंबात याआधी कोणीही अशा सरकारी घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच ज्यांच्याकडे पिवळं रेशनकार्ड आहे म्हणजेच जे दारिद्र्यरेषेखालील आहेत, त्यांना या योजनेत पहिलं प्राधान्य दिलं जातं.



योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे


जातीचा दाखला आणि रहिवासी दाखला.
आधार कार्ड आणि बँक पासबुक झेरॉक्स.
७/१२ उतारा किंवा मालमत्ता पत्रक (PR Card).
तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला.
जागेची कागदपत्रे.



अर्ज कसा करायचा ?


या योजनेचा फायदा घेण्यासाठी तम्ही तुमच्या जवळच्या समाज कल्याण कार्यालयात, जिल्हा परिषद किंवा नगरपालिकेत जाऊन अर्जाचा नमुना घेऊ शकता. अर्जासोबत जातीचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि जागेचे कागदपत्रं जोडणं विसरू नका. अर्ज भरून झाल्यावर तो संबंधित ऑफिसमध्ये जमा करा आणि तिथून आपली पोचपावती घ्या.


दरम्यान, आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही 'महाआवास' पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

Comments
Add Comment

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी