Star Pravah Channel : मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच 'स्टार प्रवाह' वाहिनी प्रेक्षकांना देणार ३ महिन्यात ८ नव्या मालिका !

मुंबई : सहा वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु होणार आहे मनोरंजनाचं नवं पर्व. स्टार प्रवाहाच्या मालिका आणि त्यातील पात्र ही लोकांना आपल्या घरची वाटतात. आपली आई, मुलगी, भाऊ, वडील, सासू प्रेक्षक आपल्या मालिकांमध्ये शोधतात. त्यामुळेच स्टार प्रवाह वाहिनीला प्रेक्षकांचं अमाप प्रेम मिळतंय. या प्रेमाची परतफेड होऊ शकत नाही पण मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन आणखीन कसं वाढेल याची स्टार प्रवाह नेहमी काळजी घेतं.


महाराष्ट्रातच नाही तर भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच एखादी वाहिनी एकाच वेळी एक नाही दोन नाही तर तब्बल आठ नव्या मालिकांची घोषणा करतेय. पाठराखीण, सुना येती घरा, विसरु नका मला, आमच्या लाडक्या नाईक बाई, मराठी मीडियम, मी कात टाकली, आता होऊ दे धिंगाणा ५ आणि स्टार प्रवाह गणेशोत्सव अश्या तब्बल ८ कार्यक्रमांची घोषणा नुकतीच करण्यात आली. या खास सोहळ्यात आठही कार्यक्रमांचे कलाकार उपस्थित होते.



‘पाठराखीण' ही गोष्ट आहे प्रत्येक संकटात आणि प्रत्येक वेदनेत एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणाऱ्या भाग्यश्री आणि प्राजक्ता या दोन बहि‍णींची आहे. बहिणींच्या नात्यातील अमाप प्रेम, त्याग आणि जिव्हाळा या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. सुख-दुःखात नेहमी सोबत असणाऱ्या या बहिणींचं आयुष्य मात्र एका अनपेक्षित वळणावर बदलतं. परिस्थिती, समाज आणि नियती यांच्या कसोटीवर त्यांचं नातं कसं टिकून रहातं, याची मांडणी या मालिकेतून पाहायला मिळणार आहे.


ठरलं तर मग, घरोघरी मातीच्या चुली यासारख्या सुपरहिट मालिका देणारी निर्मिती संस्था(Production House) अर्थात सोहम प्रोडक्शन्स या मालिकेची निर्मिती करत आहे. प्राजक्ता गायकवाड, गौरी इंगवले, शुभंकर तावडे, आशय कुलकर्णी, अदिती देशपांडे, मिताली जगताप, शकुंतला नरे, रमेश वाणी, दीप्ती लेले असे अनेक दिग्गज कलाकार मालिकेत आहेत. विघ्नेश कांबळे या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत.



नाती जपणं जितकं सुंदर, तितकंच कठीणही असतं. प्रत्येक नव्या नात्यासोबत येतात नव्या अपेक्षा, नवे विचार आणि नव्या स्वप्नांची चाहूल. अशाच नात्यांच्या अनोख्या गुंफणीची गोष्ट घेऊन स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे नवी मालिका ‘सुना येती घरा'. ही मालिका दोन कुटुंबांमधल्या भावनिक संघर्षाची आणि नव्या नात्यांनी घडणाऱ्या बदलांची कथा उलगडणार आहे. अशोक शिंदे, मेघना वैद्य, दीपा परब, शर्मिष्ठा राऊत, सत्यजीत साळोखे, शुभम पडे, सिद्धव साळोखे, मनोज कोल्हटकर असे अनेक दिग्गज कलाकार या मालिकेत आहेत.


'विसरु नको तू मला' एक उत्कट प्रेमकथा आहे. आपल्या प्रेमासाठी कोणत्याही थराला जाऊ शकणारा नायक आणि आपल्या स्वप्नांबरोबर या सच्च्या प्रेमाला सोबत घेऊन जाणारी नायिका यांची ही गोष्ट असणार आहे. तन्वी मुंडले, शाल्व किंजवडेकर, शृजा प्रभुदेसाई, शर्वाणी पिल्लई, राजेंद्र शिसाटकर, सिद्धार्थ खिरिड असे अनेक लोकप्रिय कलाकार मालिकेत आहेत. निर्माते आणि लेखक सचिन दरेकर यांनी मालिकेची कथा लिहिली आहे.



चिन्मय मांडलेकर आणि मंदार देवस्थळी या लेखक दिग्दर्शक जोडीने आजपर्यंत अनेक दर्जेदार आणि सुपरहिट मालिका दिल्या आहेत. हीच लेखक दिग्दर्शकाची जोडी आता घेऊन येतेय मराठी अस्मिता टिकवणाऱ्या मराठी मीडियमची गोष्ट. अनेक दिग्गज कलाकार या मालिकेतून भेटीला येतील. अनेक अस्सल मातीतल्या दर्जेदार मालिकांचे लेखक दिग्दर्शक निर्माते आपल्यसाठी घेऊन येता आहेत 'आमच्या लाडक्या नाईक बाई' ही मालिका. एका सामान्य शिक्षिकेची, तिच्या कुटुंबाची आणि तिच्या मुलींची गोष्ट सांगणारी ही मालिका असणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या मालिकेतून आपल्या भेटीला येतील.


चमत्कारिक,गूढ,रहस्यमय आणि नाट्यमय कथांचा एक खूप मोठा प्रेक्षकवर्ग आहे. त्यांच्याही मनोरंजनासाठी स्टार प्रवाह सज्ज आहे.म्हणूनच या मनोरंजनाच्या पर्वात येणारी पुढची मालिका म्हणजे 'मी कात टाकली'. संतोष अयाचित या मालिकेती निर्मिती करणार आहेत.मालिकांमध्ये कितीही सोशिक,रागीट,प्रेमळ अशी कोणतीही भूमिका असली तरी एक असं ठिकाण आहे,जिथे हे सगळे मुखवटे गाळून पडतात आणि प्रत्येक कलाकार कसा धिंगाणेबाज आहे, हे जिथे कळतं तो कार्यक्रम म्हणजे आता होऊ दे धिंगाणा. या कार्यक्रमात आता पाचपट मजा येणार पाचपट धिंगाणा होणार. कारण हा असणार आहे आता होउ दे धिंगाणा सिझन ५.



भव्य दिव्य सोहळे ही स्टार प्रवाहचे वैशिष्ट्य आहे. त्याच साखळीतला पुढचा सोहळा म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाचा वेगवेगळ्या गोष्टी सांगणारा महाराष्ट्राचा लाडका सोहळा यंदा पुन्हा त्याच जोशात साजरा होईल ज्याचं नाव आहे स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२६. तेव्हा आपल्या लाडक्या स्टार प्रवाह वाहिनीवर असंच प्रेम करत रहा.

Comments
Add Comment

Rohit Sharma New Reality Show : क्रिकेटच्या मैदानावर सिक्सर मारणारा हिटमॅन आता टेलिव्हिजनचा TRP वाढवणार, रोहित शर्माचा नवा रिऍलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सर्वांचा लाडका 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटर रोहित शर्मा टीव्हीवर एक नवा रिएलिटी शो घेऊन येत आहे.

Badshah Isha Rikhi Divorce : अवघ्या ५ महिन्यांतच संपलं नातं! प्रसिद्ध गायक बादशाहचा घटस्फोट; सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ

प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी यांच्या नात्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या पाच

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या