Chirag Tyagi : सुवर्णपदक जिंकून परतला, पण घरी पोहोचलाच नाही! भारताच्या २५ वर्षीय पॅरा धावपटू चिराग त्यागीची गोळ्या झाडून हत्या

गाझियाबाद : भारतीय क्रीडा विश्वाला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये घडली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणारा २५ वर्षीय टी-१२ पॅरा ॲथलीट चिराग त्यागी (Chirag Tyagi) याची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वीच चिरागने राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत आगामी पॅरा आशियाई खेळांसाठी पात्रता मिळवली होती.


चिरागचा (Chirag Tyagi) मृतदेह शनिवारी गाझियाबादमधील साई कुंज परिसरातील एका पार्कमध्ये आढळून आला. या घटनेनंतर संपूर्ण क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली असून, एका होतकरू खेळाडूचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. (Chirag Tyagi)



पार्कमध्ये आढळला मृतदेह, पोलिसांचा तपास सुरू :


शनिवारी सकाळी साई कुंज परिसरात एका तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. ओळख पटवल्यानंतर हा मृतदेह चिराग त्यागीचा (Chirag Tyagi) असल्याचे स्पष्ट झाले. प्राथमिक तपासात चिरागवर जवळून गोळ्या झाडण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून, पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. (Chirag Tyagi)



पोलिसांचे काय म्हणणे?


या प्रकरणाबाबत माहिती देताना डीसीपी धवल जैस्वाल यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी हे हत्येचे प्रकरण असल्याचे दिसत आहे. चिरागच्या (Chirag Tyagi) मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि संबंधित व्यक्तींची चौकशी यावर पोलिसांचा भर आहे.
चिरागच्या कुटुंबीयांशीही संपर्क साधण्यात आला असून, त्यांच्या तक्रारीनुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. (Chirag Tyagi)



आशियाई खेळांचे स्वप्न पूर्ण होण्याआधीच काळाने घातला घाला :


चिराग त्यागी (Chirag Tyagi) हा भारतीय पॅरा ॲथलेटिक्समधील उदयोन्मुख आणि प्रतिभावान खेळाडू म्हणून ओळखला जात होता. काही दिवसांपूर्वीच बेंगळुरूमध्ये झालेल्या राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत त्याने ४०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले होते. या यशामुळे त्याने २०२६ च्या अखेरीस जपानमध्ये होणाऱ्या पॅरा आशियाई स्पर्धांसाठी पात्रता मिळवली होती. देशासाठी आणखी पदके जिंकण्याची स्वप्ने डोळ्यांत घेऊन तो घरी परतत होता. मात्र, नियतीने त्याच्यावर क्रूर घाव घालत त्याचे आयुष्यच हिरावून घेतले. (Chirag Tyagi)



सहकारी खेळाडूवर संशयाची सुई :


तपासादरम्यान चिरागच्या (Chirag Tyagi)हत्येमागे त्याच्याच एका सहकारी ॲथलीटचा हात असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, दोघांमध्ये पूर्वीपासून काही वाद असल्याची चर्चा आहे. त्यामुळे वैयक्तिक वैमनस्य, स्पर्धात्मक मत्सर किंवा अन्य कोणते कारण या हत्येमागे आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताची कसून चौकशी सुरू असून, लवकरच या प्रकरणातील अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.



क्रीडा विश्वात शोककळा :


राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या चिराग त्यागीच्या निधनामुळे क्रीडा क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या मृत्यूने कुटुंबीय, मित्र आणि सहकारी खेळाडूंवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सोशल मीडियावरही अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. एका सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचा विजयाच्या आनंदातून काही तासांतच मृत्यूच्या दारात प्रवास होणे ही अत्यंत वेदनादायी घटना ठरली आहे. आता या हत्येमागील खरे कारण काय, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. (Chirag Tyagi)

Comments
Add Comment

India Asian Games 2026 Squad : क्रीडा मंत्रालयाकडून आशियाई खेळांसाठी ५०३ खेळाडू आणि २४६ सहाय्यक कर्मचाऱ्यांना मंजुरी

नवी दिल्ली : आशियाई खेळांसाठी ५०३ भारतीय खेळाडू, २४६ संघ अधिकारी आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचे पथक जपानला जाणार आहे.

Rohit Sharma : रोहित शर्माच्या अनुभवाकडे दुर्लक्ष करू नका; जॉन्टी ऱ्होड्सचा बीसीसीआयला मोलाचा सल्ला

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि धडाडीचा फलंदाज रोहित शर्मा याच्या भविष्याबाबत आ

India A : न्यूझीलंड दौऱ्यावर भारत 'अ' संघ तीन चार-दिवसीय सामने खेळणार

नवी दिल्ली : भारतीय संघाचा २४ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान होणारा महत्त्वपूर्ण दौरा, युवा क्रिकेटपटूंना

ICC Test Rankings : गिल-बुमराहच्या क्रमवारीत घसरण, पडिक्कलची मोठी झेप

दुबई : आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय कर्णधार शुभमन गिल आणि स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांची घसरण झाली

Krunal Pandya : भारताच्या टी२० संघातून वगळल्यानंतर कृणाल पांड्या निराश

नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. संघाच्या घोषणेपूर्वी, एका

China Masters : भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचे आव्हान संपुष्टात

शेन्झेन : भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचे चायना मास्टर्समधील आव्व्हान संपुष्टात आले आहे. लक्ष्यला कॅनडाच्या