Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या डिजिटल भविष्यास मोठी चालना; एअरट्रंकची ₹२ लाख कोटींची गुंतवणूक

मुंबई : महाराष्ट्राच्या डिजिटल पायाभूत सुविधांना मोठी चालना देणारी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. ऑस्ट्रेलियास्थित डेटा सेंटर कंपनी AirTrunk चे मुख्य कार्यकारी अधिकारी रॉबिन खुडा (Robin Khuda) यांचे महाराष्ट्रात स्वागत करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी रायगड जिल्ह्यातील पेन ग्रोथ सेंटर येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य डेटा सेंटर प्रकल्पासाठी जमीन वाटपाच्या उद्देशपत्राची (Letter of Intent) देवाणघेवाण झाल्याची माहिती दिली.



या प्रकल्पासाठी तब्बल २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून डेटा सेंटरची क्षमता ३ गिगावॅट (GW) इतकी असणार आहे. राज्यातील डिजिटल अर्थव्यवस्था, डेटा स्टोरेज आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार असल्याचे मानले जात आहे.


मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे सांगितले की, रायगडच्या पेन ग्रोथ सेंटर (ऑरेंज सिटी) येथे प्रस्तावित डेटा सेंटरमुळे महाराष्ट्राला जागतिक डेटा इन्फ्रास्ट्रक्चर नकाशावर अधिक मजबूत स्थान मिळेल. या गुंतवणुकीमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्यासह अत्याधुनिक डिजिटल सुविधा विकसित होणार आहेत.


विशेष म्हणजे, जगातील आघाडीची गुंतवणूक कंपनी ब्लॅकस्टोन (Blackstone) या प्रकल्पाला पाठबळ देत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासाला आणखी वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



या बैठकीला भारतातील ऑस्ट्रेलियाचे वाणिज्यदूत पॉल मर्फी (Paul Murphy) हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या उपस्थितीबद्दल आभार व्यक्त करत भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य अधिक बळकट होत असल्याचे नमूद केले.


राज्यात मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात असून, महाराष्ट्राला देशातील प्रमुख डिजिटल आणि डेटा सेंटर हब बनविण्याच्या दिशेने हे आणखी एक मोठे पाऊल असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.




Comments
Add Comment

Pune News: ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी! PMPML बस प्रवासात 50 टक्के सवलत; 1 नोव्हेंबरपासून नवा निर्णय लागू

Pune News: पुणे,

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला बारा वर्षे पूर्ण; राजकारणातील एक तप आणि विकासाचा नवा अध्याय!

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वानखेडे स्टेडियमवरील ऐतिहासिक शपथविधीला ३१ ऑक्टोबर,

Cm Devendra Fadanvis News: राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय! चारा परराज्यात पाठविण्यास बंदी...

मुंबई: राज्यातील चारा परराज्यात पाठवण्यावर कायदेशीर बंदी घालण्यात आली असून, चाऱ्याचा वापर बायोफ्युएल किंवा

Pankaja Munde : चारा टंचाईवर मात करण्यासाठी 5 टक्के निधीची तरतूद, राज्य सरकारचा कृती आराखडा जाहीर

मुंबई: अल-निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण घटल्याने राज्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

दुष्काळी परिस्थितीत सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा, मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चाऱ्याचे दर निश्चित

मुंबई: दुष्काळजन्य परिस्थितीतील संभाव्य चारा टंचाईवर मात करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने

PM Kisan Samman Nidhi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसानच्या 24 व्या हप्त्याचे वितरण; महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी 'पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना'चा 24 वा हफ्ता वितरित