Maria Juliana : प्रसिद्ध तमिळ अभिनेत्रीचा मुख्यमंत्री थलपती विजयवर गंभीर आरोप ; "माझ्या मिसकॅरेजसाठी..."

प्रसिद्ध तमिळ अभिनेत्रीचा मुख्यमंत्री जोसेफ विजयवर गंभीर आरोप ;


तामिळनाडूचे मुख्यमंत्री श्री जोसेफ विजय यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. 'बिग बॉस तमिळ'मध्ये झळकलेली अभिनेत्री जुली म्हणजेच मारिया ज्युलियाना हिने आता धक्कादायक आरोप केला आहे. थलपती विजय यांच्या TVK या राजकीय पक्षामुळे तिने आपलं बाळ गामावल्याचं तिने सांगितले आहे. सोशल मीडियावर तिला ट्रोल केल्यामुळे तिला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला आणि यामुळेच तिचं मिसकॅरेज झालं असं जुलीने म्हटलं आहे.


चेन्नईत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत जुलीने भावूक होऊन अनेक खळबळजनक खुलासे आणि आरोप केले. तिने सांगितलं की, मार्च महिन्यात ट्रोलिंगप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. जुली पुढे म्हणाली की,'TVK'चं सरकार आल्यावर तिला ही नोटीस का पाठवण्यात आली, हे तिला समजलेलं नाही. यानंतर तिच्यावर १५ लाख रुपयांचा किडनी घोटाळ्याचा खोटा आरोप लावण्यात आला. TVKने याची संपूर्ण गोष्ट, स्क्रीनप्ले, दिग्दर्शन आणि सादरीकरण आधीच तयार करून ठेवलं होतं. यामागे एक TVK समर्थक आणि एक वकील आहे. या सगळ्यामुळे आम्ही आमचं बाळ गमावलं."



"आमचं हे पहिलंच बाळ होतं जे आम्ही गमावलं”


ती पुढे म्हणाली, "माझं नुकतेच लग्न झालं होतं आणि आमचं हे पहिलंच बाळ होतं जे आम्ही गमावलं. ऑनलाईन छळ आणि मानसिक तणावामुळे मी माझं बाळ दगावलं. मी या गोष्टीचा वापर सहानुभूती मिळवण्यासाठी करू शकते, पण माझा मुद्दा हा आहे कि माझ्याबद्दल आणि माझ्या पतीबद्दल अत्यंत घाणेरड्या आणि खोट्या गोष्टी पसरवल्या गेल्या आहेत. फक्त एक महिला टीव्हीके विरोधात बोलतेय म्हणून कोणतीही लाज न बाळगता तिचं नाव खराब केलं जात आहे. आता माझ्याकडे बोलण्यासारखे काही उरलेलं नाही."



"विजय अण्णा इन्स्टाग्राममुळे मुख्यमंत्री बनले"


"लोक म्हणतात की, विजय अण्णा इन्स्टाग्राममुळे मुख्यमंत्री बनले. स्वतःच्या विरोधात बोलणाऱ्यांवर हल्ले करण्यापेक्षा त्यांनी जनतेसाठी काहीतरी करायला नको का? मी डीएमकेच्या काळात तक्रार केली होती, पण ती निवडणुकीदरम्यान होती. आता नवीन सरकार आलं आहे, तर त्यांनी ही जबाबदारी घ्यायला नको का?"



"माझ्या मिसकॅरेजसाठी मी विजय अण्णालाच जबाबदार ठरवणार"


अभिनेत्रीने असाही आरोप केला की, तिची तक्रार गांभीर्याने घेतली जात नाहीए, कारण ज्या ८ जणांविरोधात तिने तक्रार केली आहे, ते सर्व टीव्हीकेचे समर्थक आहेत. जुलीने रडत रडत म्हटलं, "माझ्या मिसकॅरेजसाठी विजय अण्णाच जबाबदार आहेत. त्यांनी थेट काही केलं नसलं, तरी त्यांनी एकदा जरी आपल्या समर्थकांना मागे हटण्यास सांगितलं असतं, तर आज मला हे दिवस पाहावे लागले नसते."



जेव्हा पत्रकारांनी तिला विचारलं की, ती टीव्हीके समर्थक आणि विजय यांना या फेक सोशल मीडिया अकाऊंट्सशी का जोडत आहे? आणि डीएमके सरकार असताना ती का बोलली नाही? तेव्हा जुलीने उत्तर दिलं, "मी आता बोलत आहे कारण हे सर्व आता माझ्यासोबत घडलं आहे." जुली ही मुख्यमंत्री विजय यांचा विरोधी पक्ष असलेल्या डीएमकेची समर्थक राहिली आहे. तामिळनाडू निवडणुकीदरम्यान तिने उघडपणे विजय यांच्या पक्षाचा विरोध केला होता आणि रॅलीमध्ये विधानंही केली होती.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’