दख्खनची राणी'चे ९७ व्या वर्षात पदार्पण

मुंबई : मध्य रेल्वेची अत्यंत लोकप्रिय आणि मानाची ट्रेन असलेल्या “डेक्कन क्वीन” (दख्खनची राणी) ने सोमवारी १ जून रोजी आपल्या सेवेच्या गौरवशाली ९७ व्या वर्षात पदार्पण केले आहे. मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांना जोडणाऱ्या या ऐतिहासिक ट्रेनने प्रवाशांच्या सेवेची ९६ वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केली असून, १ जून १९३० रोजी ही सेवा सुरू झाली होती. या खास निमित्ताने पुणे रेल्वे स्थानक आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वे अधिकारी, प्रवासी आणि रेल्वेप्रेमींच्या उपस्थितीत केक कापून व गाडीला फुलांनी सजवून वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.



यंदा डेक्कन क्वीनमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक आधुनिक बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांना आधुनिक फर्निचर आणि सुधारित अंतर्गत सजावटीसह भोजनाचा उत्तम अनुभव घेता येणार आहे. तसेच विनाइल फ्लोअरिंग, ड्युरो वाइप मॅट्स, साबण आणि टिश्यू डिस्पेन्सरची सुविधा असेल. आरामदायी आसनव्यवस्था असेल त्यासाठी वातानुकूलित चेअर कारमध्ये नवीन आसन कव्हर्स आणि डब्यांमध्ये 'एअर फ्रेशनर डिस्पेन्सर'ची सुविधा देण्यात येणार आहे.



डेक्कन क्वीनची वैशिष्ट्ये


भारतीय रेल्वेमध्ये टेबल सर्व्हिस आणि मायक्रोवेव्ह, डीप फ्रीझरसारख्या आधुनिक पॅन्ट्री सुविधा असलेली ही एकमेव धावणारी ट्रेन आहे. सुरुवातीला ७ डब्यांसह धावणारी ही ट्रेन आता एलएचबी तंत्रज्ञानाच्या १६ डब्यांसह धावते. यात आकर्षक 'व्हिस्टाडोम कोच'चाही समावेश आहे, ज्यातून प्रवाशांना पश्चिम घाटातील निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेता येतो. देशात प्रथमच रोलर बेअरिंग डबे, स्वयं-निर्मित डबे (११० व्होल्ट प्रणाली) आणि प्रथम व द्वितीय श्रेणी चेअर कार सुरू करण्याचा मान या ट्रेनला आहे. अचूक वेळ आणि सर्वोत्तम सेवेच्या जोरावर डेक्कन क्वीन ही केवळ वाहतुकीचे साधन न राहता मुंबई-पुणेकरांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली आहे, असे प्रतिपादन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी केले.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने