BMC News : घाटकोपर ते मुुलुंडमधील पूर्व द्रुतगती महामार्गावर हळद उधळणार

- पिवळा बहाव्याची करणार लागवड


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबईचे महत्त्वाचे प्रवेशमार्ग असलेल्या वाशी नाका तसेच ऐरोली नाका या दोन्ही परिसरात पर्यावरणपूरक आणि आकर्षक असा हरितक्षेत्र विकास करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घ्‍यावा. महामार्गाच्या दुतर्फा हरित क्षेत्र विकसित करावे, या अंतर्गत अनावश्यक झुडपे काढून परिसर स्वच्छ करावा. नियोजनबद्ध पद्धतीने वृक्षारोपण करावे. हरित पट्टा अधिक आकर्षक आणि नयनरम्य करण्यासाठी फुलझाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड करावी. पंतनगर ते मुलुंड या मार्गावरील पूर्व द्रुतगती महामार्गाच्या खाडीकिनारी असलेल्या भागात एन, एस आणि टी या तीनही प्रभागांच्या हद्दीत पिवळ्या बहाव्याची लागवड करण्याचा विशेष उपक्रम राबविण्यात यावा, असे विविध निर्देश मुंबईच्‍या महापौर रितू तावडे यांनी दिले. (BMC News)


या हरितक्षेत्र विकासाचा प्रातिनिधिक शुभारंभ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून २०२६ रोजी करावयाचा आहे. या उपक्रमामुळे मुंबईच्‍या प्रवेशमार्गांना सौंदर्यपूर्ण स्वरूप प्राप्त होण्याबरोबरच पर्यावरण संरक्षण, जैवविविधता संवर्धन आणि स्वच्छ व निरोगी वातावरण निर्मितीस हातभार लागेल, असा विश्‍वासही महापौर तावडे यांनी व्‍यक्‍त केला. मुंबईच्‍या महापौर रितू तावडे यांनी १ जून २०२६) वाशी नाका आणि ऐरोली नाका येथे हरितक्षेत्र विकास संदर्भात स्थळ पाहणी केली. त्‍यावेळी त्‍यांनी विविध निर्देश दिले. (BMC News)



एम पूर्व विभागाच्‍या प्रभाग समिती अध्यक्ष खैरनुसा अकबर हुसेन, उपायुक्त (परिमंडळ ५) संध्या नांदेडकर, उपायुक्त (परिमंडळ ६) संतोषकुमार धोंडे, विभागीय वन अधिकारी (कांदळवन कक्ष) दीपक खाडे, टी विभागाच्या सहायक आयुक्त योगिता कोल्हे, एम पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता तथा सहायक आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) भास्कर कसगीकर, वन परिक्षेत्र अधिकारी (कांदळवन कक्ष) प्रशांत बहादुरे, उप उद्यान अधीक्षक सुनील राठोड, महानगरपालिकेच्‍या पूल विभागाचे कार्यकारी अभियंता नामदेव रावकाळे यांच्‍यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. (BMC News)


मुंबईत प्रवेश करताना वाशी नाका आणि ऐरोली नाका या दोन्ही ठिकाणाहून दररोज हजारो वाहनांची आणि नागरिकांची वर्दळ होत असते. त्यामुळे या परिसरांचे सुशोभीकरण आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून हरितक्षेत्र विकास करणे अत्यंत आवश्यक आहे. या दोन्ही ठिकाणी महामार्गाच्या दुतर्फा नियोजनबद्ध हरित क्षेत्र विकसित करून महामार्गांना अधिक सुंदर आणि पर्यावरणस्नेही स्वरूप प्रदान करता येईल. या उपक्रमामुळे परिसरातील धूळ नियंत्रणास मदत होईल, वाहनांमधून होणाऱ्या प्रदूषणाचा परिणाम कमी करण्यास हातभार लागेल तसेच हवेची गुणवत्ता सुधारण्यासही मदत होईल. या प्रकल्प अंतर्गत महामार्गालगत वाढलेली झुडपे, तण आणि अनावश्यक वनस्पती काढून त्या ठिकाणी सुयोग्य पद्धतीने हरित पट्ट्यांची निर्मिती करण्यात यावी. वृक्षारोपणासाठी आकर्षक फुलझाडांना प्राधान्य देत पिंक टेब्यूबिया आणि पिवळा बहावा यांसारख्या वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करावी. या वृक्षांमुळे परिसराचे सौंदर्य खुलून येईल, तर घनदाट हिरवाईमुळे पर्यावरणीय समतोल राखण्यास मदत होईल. या हरित पट्ट्यांमध्ये स्थानिक जैवविविधतेला पूरक ठरणाऱ्या वनस्पतींचाही समावेश करता येईल, असे महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट केले. (BMC News)



पंतनगर ते मुलुंड या दरम्यान पूर्व द्रुतगती महामार्गालगत खाडीच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागांवर एन, एस आणि टी या तिन्ही प्रशासकीय विभागांच्या माध्यमातून पिवळ्या बहाव्याची विशेष लागवड करण्यात यावी. खाडीकिनारी निर्माण होणारा हा बहुगुणी पट्टा पर्यावरण संवर्धनाबरोबरच मुंबईच्‍या सौंदर्यात भर घालणारा ठरेल. या उपक्रमामुळे हरित आच्छादन वाढेल, कार्बन शोषणास चालना मिळेल, पक्षी व इतर जीवांसाठी अनुकूल अधिवास निर्माण होईल आणि नागरिकांना अधिक स्वच्छ व निरोगी वातावरण लाभेल. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शुक्रवार, ५ जून २०२६ रोजी या उपक्रमाचा प्रातिनिधिक आरंभ करण्यात यावा. (BMC News)

Comments

bharati nehate    June 2, 2026 07:28 AM

कडू नीम, औदुंबर, वड ,पिंपळ देखील लावायला हवेत.

Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर