Dawood's Right Hand Munna Jhingada : दाऊदचा 'राईट हँड' मुन्ना झिंगाडा 'आयएसआय'च्या रडारवर? जाणून घ्या कोण आहे मुन्ना झिंगाडा

मुंबई : मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात एकेकाळी दहशतीचे दुसरे नाव मानला जाणारा सय्यद मुज्जक्किर मुद्दस्सर हुसेन उर्फ मुन्ना झिंगाडा (Munna Jhingada) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. भारतविरोधी कारवायांशी संबंधित कथित हेरगिरी प्रकरणाच्या तपासात त्याचे नाव समोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले आहे. मुंबईतील स्थानिक गुंड म्हणून गुन्हेगारीची सुरुवात करणारा हा व्यक्ती पुढे डी-कंपनी, छोटा शकील आणि पाकिस्तानातील कथित गुप्तचर नेटवर्कशी जोडला गेल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.



हेरगिरी रॅकेटमध्ये नाव समोर :


सन २०२३ मध्ये उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (ATS) पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ISI साठी कार्यरत असल्याचा संशय असलेल्या हेरगिरी रॅकेटचा पर्दाफाश केला होता. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये वास्तव्यास असलेल्या मुन्ना झिंगाडाने (Munna Jhingada) आपल्या नातेवाईकांच्या माध्यमातून भारतात काही व्यक्तींना निधी पुरवून संवेदनशील माहिती गोळा करण्याचे जाळे उभारल्याचा आरोप आहे.



या प्रकरणात त्याचा (Munna Jhingada) मावस काका सय्यद अरमान आणि त्याचा सहकारी मोहम्मद रईस यांना अटक करण्यात आली होती. भारतीय लष्कराशी संबंधित संवेदनशील ठिकाणांची छायाचित्रे आणि माहिती गोळा करून ती परदेशातील हँडलर्सपर्यंत पोहोचवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तपास यंत्रणांच्या मते, या संपूर्ण साखळीमागे मुन्ना झिंगाडाची (Munna Jhingada) भूमिका असल्याचा संशय आहे. या प्रकरणात तो अद्याप फरार आणि वाँटेड आरोपी मानला जातो.



विद्यार्थीदशेतून गुन्हेगारीकडे वळलेला प्रवास :


मुन्ना झिंगाडाच्या (Munna Jhingada) गुन्हेगारी कारकिर्दीची सुरुवात १९९० मध्ये झाली. त्यावेळी तो जोगेश्वरी परिसरातील महाविद्यालयात शिक्षण घेत होता. मित्रांमधील वादातून झालेल्या एका खुनाच्या प्रकरणात त्याचे नाव समोर आले आणि त्यानंतर त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. जामिनावर सुटल्यानंतर काही काळ त्याने वडिलांच्या प्लंबिंग व्यवसायात काम केले. मात्र लवकरच तो पुन्हा गुन्हेगारीकडे वळला. १९९० च्या दशकात खून, खुनाचा प्रयत्न आणि खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचे नाव वारंवार समोर येऊ लागले. याच काळात त्याने मुंबई सोडून उत्तर प्रदेशातील आपल्या मूळ गावी आश्रय घेतला आणि तेथे शस्त्र हाताळण्याचे प्रशिक्षण घेतल्याचेही सांगितले जाते.



छोटा शकीलमार्फत डी-कंपनीशी संबंध :


१९९६ मध्ये अटकेनंतर आर्थर रोड कारागृहात असताना त्याची ओळख छोटा शकीलच्या निकटवर्तीयांशी झाली. यानंतर त्याचा अंडरवर्ल्डमधील प्रभाव झपाट्याने वाढला. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पुढील काही वर्षांत त्याने डी-कंपनीसाठी अनेक सुपारी हत्यांमध्ये सहभाग घेतल्याचा आरोप आहे. हवाला व्यवहारांशी संबंधित व्यावसायिकांच्या हत्यांपासून प्रतिस्पर्धी टोळ्यांविरोधातील कारवायांपर्यंत त्याचे नाव अनेक गुन्ह्यांत जोडले गेले. याच काळात त्याची ओळख अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याचा विश्वासू सहकारी छोटा शकील यांच्या नेटवर्कशी जोडली गेल्याचे सांगितले जाते. (Munna Jhingada)



बँकॉकमधील छोटा राजन हल्ल्यात सहभागाचा आरोप :


सन २००० मध्ये छोटा राजन याच्यावर थायलंडमधील बँकॉक येथे झालेल्या हल्ल्याने जगभरात खळबळ उडवली होती. या हल्ल्यामागे छोटा शकीलच्या पथकाचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता. तपासादरम्यान मुन्ना झिंगाडाचे (Munna Jhingada) नावही समोर आले. या प्रकरणात थायलंड पोलिसांनी त्याला अटक केली आणि न्यायालयाने त्याला दोषी ठरवत ११ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. मात्र, या हल्ल्यातून छोटा राजन बचावला होता.



प्रत्यार्पणावरून भारत-पाकिस्तान वाद :


शिक्षा पूर्ण झाल्यानंतर भारताने त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र पाकिस्तानने तो भारतीय नसून पाकिस्तानी नागरिक असल्याचा दावा केला. यानंतर हा वाद न्यायालयात पोहोचला. मुंबई पोलिसांनी त्याची जन्मनोंद, गुन्हेगारी नोंदी आणि बोटांचे ठसे सादर करून तो भारतीय नागरिक असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. फॉरेन्सिक तपासणीतही काही पुरावे भारतीय दाव्याला पूरक असल्याचे सांगण्यात आले. तरीही २०१९ मध्ये थायलंडच्या उच्च न्यायालयाने भारताची प्रत्यार्पण याचिका फेटाळून लावली. (Munna Jhingada)



आजही कराचीत असल्याचा संशय :


प्रत्यार्पण प्रक्रिया अपयशी ठरल्यानंतर मुन्ना झिंगाडा (Munna Jhingada) पाकिस्तानातील कराची येथे पोहोचल्याची माहिती समोर आली. भारतीय तपास यंत्रणांच्या मते, तो आजही तेथे वास्तव्यास असून दाऊद इब्राहिमच्या नेटवर्कच्या संरक्षणाखाली कार्यरत असल्याचा संशय कायम आहे. मुंबईतील एका स्थानिक गुंडापासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुन्हेगारी आणि कथित हेरगिरी प्रकरणांपर्यंत पोहोचलेला मुन्ना झिंगाडाचा प्रवास हा भारतीय सुरक्षा यंत्रणांसाठी आजही चिंतेचा विषय मानला जातो. त्याच्याविरोधातील विविध प्रकरणांचा तपास सुरू असून, तो अद्याप भारतीय तपास यंत्रणांच्या ‘मोस्ट वाँटेड’ यादीतील महत्त्वाच्या नावांपैकी एक मानला जातो. (Munna Jhingada)

Comments
Add Comment

SBI च्या डेटा लीकवर बँकेची पोस्ट; खात्यातील पैसे सुरक्षित असल्याची दिली ग्वाही!

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ३,८९७ ग्राहकांची वैयक्तिक माहिती डार्क वेबवर उघड झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला

प्रसिद्ध सुवर्णकार थिरु वुमिडी एथिराज यांचे निधन; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली आदरांजली

भारताचे प्रसिद्ध सुवर्णकार आणि कारागीर थिरु वुमिडी एथिराज यांचे बुधवारी (२१ ऑक्टोबर २०२६) चेन्नई येथे वयाच्या

Nashik Kumbh Mela : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सिंहस्थ कुंभमेळ्याचे खास निमंत्रण ! पेटी उघडताच उलगडणार महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वैभवशाली वारसा

Nashik Kumbh Mela : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याची उत्सुकता आता शिगेला

HDFC बँकेत खळबळ! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून गोपनीय माहिती लीक?

बाजारमूल्यानुसार भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी (HDFC)बँकेच्या अंतर्गत चौकशीत, दोन वरिष्ठ

Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेन 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार, रेल्वेच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

रील बनवण्याच्या नादात चिमुकलीचा जीव धोक्यात? समुद्राच्या लाटांमधून अनोळखी व्यक्तीने वाचवलं; व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात आपण किती निष्काळजी होऊ शकतो, याची जाणीव करून देणारा एक व्हिडिओ सध्या