Diksha Karkar : व्यवसायधारकांकडून नोंदणी शुल्क आणि कचरा निर्मुलन आकार पुन्हा वसूल करा

विधी समिती अध्यक्षा दिक्षा कारकर यांची आयुक्तांकडे मागणी


मुंबई : केंद्र शासनाच्या एक देश एक कर प्रणाली या संकल्पनेनुसार वस्तू सेवा कर प्रणाली (जीएसटी) अवलंबित केल्यामुळे मुंबई महापलिका कार्यक्षेत्रात जकात वसूल करण्याचे कामकाज मुळे बंद झालेले असल्याने महापालिकेच्या महसूलात अत्यंत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. त्यामुळे या महसूल वाढीच्या दृष्टीकोनातून पाऊल उचलणे आवश्यक आहे. याकरता दुकाने व आस्थापना अंतर्गत नोंदणी होणाऱ्या व्यवसाय धारकांकडून वर्षानुवर्षे वसूल केले जाणारे नोंदणी शुल्क व कचरा निर्मूलन आकार (टीआरसी) हे सन २०१७ पासून वसूल करण्याचे थांबविण्यात आलेले आहे, ते पुन्हा एकदा सुरु करण्यात यावे अशाप्रकारची मागणी विधी व महसूल समिती अध्यक्षा दिक्षा कारकर यांनी महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.



महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात विधी व महसूल समिती अध्यक्षा दिक्षा कारकर यांनी असे नमुद केले आहे की, सन २०१७ पूर्वी दुकाने व आस्थापना अधिनियमातंर्गत व्यवसायाची नोंदणी करणे व नुतनीकरण करणे यापासून नोंदणी शुल्क/नुतनीकरण शुल्क व कचरा निर्मूलन आकार यापोटी महापालिकेस सर्वसाधारणपणे दरवर्षी ६० ते ८० कोटी इतका महसूल जमा होत होता. परंतु मागील सन २०१७ पासून आजमितीस महापालिकेस अंदाजित सर्वसाधारणपणे कमीतकमी ३०० ते ५०० कोटी रुपयांच्या महसूलावर विनाकारण पाणी सोडावे लागलेले आहे, याची दखल घेणे आवश्यक आहे.



दुकाने व आस्थापना अंतर्गत नोंदणी होणाऱ्या व्यवसाय धारकांकडून वर्षानुवर्षे वसूल केले जाणारे नोंदणी शुल्क व कचरा निर्मूलन आकार (टीआरसी) हे सन २०१७ पासून वसूल करण्याचे थांबविण्यात आलेले आहे, हे पुनःश्च सुरु करण्यात यावे. महापालिकेच्या प्रचलित धोरणानुसार व्यापारी आस्थापनाधारकांकडून नोंदणी शुल्क तथा नुतनीकरण शुल्क त्याचबरोबर दरवर्षी कचरा निर्मूलन आकार (टीआरसी) वसूल करणेस विनाविलंब सुरुवात करावी, जेणेकरून त्यामुळे महापालिकेच्या महसूलात वाढ होण्याची शक्यता आहे,असे कारकर यांनी आपल्या या निवेदनात नमुद केले आहे.दुकाने व आस्थापना या खात्यात एकूण निरिक्षक संवर्गाची १२७ पदे अनुसूचीवर असून आजमितीस केवळ एकूण कर्मचारी संख्येपैंकी केवळ ४५ टक्के म्हणजे ५७ पदे कार्यरत आहेत. मुंबई शहरातील एकूण् आस्थापनांची पाहणी करणे व कार्यालयीन कामकाज करताना या कर्मचाऱ्यांची होणारी ओढाताण लक्षात घेता कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचीही मागणी त्यांनी केली.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म