Surat Bus Accident : सुरतमध्ये महाराष्ट्राच्या दोन 'एसटी' बसचा अपघात

सुरत : गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील बारडोली जवळून जाणाऱ्या धुळे हायवेवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दोन एसटी बसचा अत्यंत थरकाप उडवणारा भीषण अपघात झाला आहे. दोन बसमध्ये झालेली समोरासमोर धडक इतकी भयानक होती की, धडकेनंतर एक एसटी बस थेट महामार्गावर उलटली आणि क्षणार्धात तिने पेट घेतला. या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने आठ प्रवाशांचा जागीच होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.हा अपघात बारडोली तालुक्यातील उवा आणि मानेकपोर गावाच्या दरम्यान मंगळवारी सायंकाळी ५ ते सव्वा पाच वाजेच्या सुमारास घडला. अपघातात बळी पडलेल्या महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या दोन्ही एसटी बसचे क्रमांक एमएच १८ बीझेड १२५८ आणि एमएच २० बीएल ३३९० असे आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, यातील एक बस (धुळे-सुरत) धुळ्याहून नंदूरबार-नवापूर मार्गे सुरतच्या दिशेने येत होती, तर दुसरी बस गुजरातहून महाराष्ट्राच्या दिशेने जात होती. चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक बस आधी हायवेवरील डिव्हायडरला जाऊन धडकली. याच वेळी समोरून येणारी दुसरी बस तिला वाचवण्याच्या प्रयत्नात बाजूला जात असताना थेट महामार्गावर उलटली. बस उलटताच एका मोठ्या स्फोटाने आगीचा गोळा बनली. आग इतकी वेगाने पसरली की आतील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या अपघातात दुसऱ्या बसच्या पुढच्या भागाचाही पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे.भयानक अपघाताची माहिती मिळताच बारडोली अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक पोलीस आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. बसला लागलेली आग भीषण असल्याने सुरुवातीला आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ बचावकार्य सुरू करत जखमींना बसबाहेर काढले.





दुर्घटनेत होरपळलेल्या प्रवाशांपैकी आठ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेऊन ते तातडीने बारडोली येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.अपघातामुळे धुळे-सुरत हायवेवर दोन्ही बाजूंनी अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासन सध्या क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून हायवेवरील वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न करत आहे.


परिवहनमंत्र्यांनी जाहीर केली मदत


सुरत–धुळे आणि जामनेर-सुरत या एसटी बसेसना गुजरातमधील व्यारा येथे झालेल्या भीषण अपघाताची बातमी अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना तसेच एसटी कर्मचाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून, या कठीण प्रसंगी संपूर्ण एसटी परिवार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत देण्यात येणार असून, जखमी प्रवाशांवर मोफत आणि सर्वोत्तम वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जखमींनी लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना; असे राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. त्यांनी अपघाताची माहिती मिळताच दुःख व्यक्त केले आणि प्रशासनाला मदत करण्यासाठी आवश्यक ते निर्देश दिले.

Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा