Surat ST Bus Accident : गुजरातमध्ये भीषण एसटी अपघातात ७ जणांचा होरपळून मृत्यू तर ४१ प्रवासी जखमी; जाणून घ्या नेमका कसा घडला अपघात

सुरत : गुजरातमधील सुरत जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) दोन बसमध्ये झालेल्या भीषण अपघाताने मोठी दुर्घटना घडली. बारडोलीजवळ धुळे महामार्गावर समोरासमोर झालेल्या या धडकेत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला असून ४१ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर लागलेल्या आगीमुळे अनेक प्रवासी गंभीररित्या भाजले गेले. मृतांची अवस्था इतकी विदारक आहे की, त्यांपैकी केवळ एका व्यक्तीची ओळख पटली असून उर्वरित मृतांची ओळख डीएनए चाचणीद्वारे निश्चित करावी लागणार आहे. (Surat ST Bus Accident)



अपघात नेमका कसा घडला?


मिळालेल्या माहितीनुसार, उवा गावाजवळ रस्त्यावर पाण्याचा टँकर पलटी झाला होता. त्याचवेळी धुळे आगाराची एसटी बस सुरतकडे जात होती. टँकर पलटी झाल्याची माहिती चालकाला वेळेत न मिळाल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. परिस्थिती सावरण्यासाठी चालकाने बस वळविण्याचा प्रयत्न केला; मात्र बस थेट महामार्गाच्या विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये गेली. याच वेळी समोरून येणारी सुरत-जामनेर एसटी बस त्या मार्गावरून जात होती. दोन्ही बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेनंतर सुरत-जामनेर बस रस्त्यालगतच्या पाटात कोसळली आणि काही क्षणांतच तिला आग लागली. त्यामुळे बसमधील प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी फारसा वेळ मिळाला नाही. (Surat ST Bus Accident)



मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी :


बारडोली येथील सरदार शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भावेश पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या सात जणांपैकी फक्त एका व्यक्तीची ओळख पटली आहे. तो सुरत-जामनेर बसचा चालक असल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित सहा मृतदेह आगीत पूर्णपणे जळाल्याने त्यांची ओळख पटवणे अत्यंत कठीण झाले आहे. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांचे डीएनए नमुने घेऊन त्यांची तुलना करण्यात येणार आहे. नातेवाईक बारडोली येथे पोहोचल्यानंतर त्यांच्या नमुन्यांच्या आधारे मृतांची ओळख निश्चित करण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. (Surat ST Bus Accident)



जखमींवर उपचार सुरू :


अपघातातील ४१ जखमींना तातडीने विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक प्रशासन, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य राबवले. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर बसमधील अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. (Surat ST Bus Accident)



मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला शोक :


या भीषण दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृतांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी राज्य सरकार मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी जखमी प्रवाशांना आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार आणि मदत पुरविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच महाराष्ट्र एसटी प्रशासन, जळगाव जिल्हा प्रशासन आणि सुरत जिल्हा प्रशासन यांच्यात सतत समन्वय सुरू असून मदतकार्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Surat ST Bus Accident)


दरम्यान, या अपघातामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून दुर्घटनेमागील नेमकी कारणे आणि संभाव्य निष्काळजीपणाचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू करण्यात आला आहे. (Surat ST Bus Accident)

Comments
Add Comment

Tragic CNG Pump Accident : CNG भरताना होज फुटला, नोजल डोक्याला लागला; 24 वर्षीय पंप कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

जमशेदपूर : कारमध्ये CNG भरत असताना अचानक रिफ्युएलिंग होज फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पेट्रोल पंपावरील 24

Tamil nadu crime news : तमिळनाडू हादरले! पाण्याच्या टाकीत आढळले महिलेचे छिन्नविच्छिन्न अवशेष; दागिन्यांच्या चोरीसाठी हत्येचा संशय

सेलम : तमिळनाडूतील सेलम (Taamilnadu Crime News) जिल्ह्यात एक अत्यंत भयानक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. घराच्या छतावर

IndiGo Emergency Landing : गोवा-दिल्ली इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग; इंजिनमध्ये बिघाड झाल्याने २२९ प्रवाशांचा जीव टांगणीला

गोवा : गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एयरलाइन्सच्या विमानाचे मंगळवारी सकाळी गोवा विमानतळावर तातडीने

Nepal green house miracle : नेपाळमधील महापुरात सर्वकाही वाहून गेले; पण ४० वर्षे जुने 'हिरवे घर' कसे टिकून राहिले ? घरमालकाने सांगितली आपवीती

काठमांडू : "जेव्हा तुम्हाला वाटतं की हे तुमच्या आयुष्याचे शेवटचे क्षण आहेत, तेव्हा डोक्यात काय विचार येऊ शकतात?

Gold Silver Rate Today : PM मोदींचे 'ते' आवाहन अन् सोन्या-चांदीचे भाव गडगडले! चांदी थेट 'इतक्या' हजारांनी स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

मुंबई : परदेशी चलनावरील वाढता दबाव कमी करण्यासाठी आणि देशांतर्गत बाजारपेठेत संतुलन राखण्यासाठी पंतप्रधान

Uzbekistan 30 Days Visa Free Entry : भारतीय पर्यटकांसाठी मोठी खुशखबर! उझबेकिस्तानमध्ये ३० दिवस व्हिसामुक्त प्रवास

नवी दिल्ली : परदेशात फिरण्याचा प्लॅन करणाऱ्या भारतीय पर्यटकांसाठी मोठी खुशखबर आहे. उझबेकिस्तानने भारतीय