Vaibhav Mangle Social Media Post : सुमन कल्याणपूर यांच्या निधनानंतर वैभव मांगले भावुक; 'त्यांच्या प्रतिभेला हवी तशी दाद मिळाली नाही'

मुंबई : सुमन कल्याणपूर यांच्या निधनानंतर मराठी अभिनेते वैभव मांगले (Vaibhav Mangle) यांनी भावुक पोस्ट (Post) शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सुमनताईंचा आणि लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या आवाजातील साधर्म्याचा उल्लेख करत त्यांनी एक खंतही व्यक्त केली.


या पोस्टमध्ये वैभव मांगलेनं लिहिलंय की, "ओठावरी विरला ग आसावला सूर' सुरुवातीचा काही काळ सुमन ताई लता बाईंसारखच गातं होत्या… अनेक अशी उदाहरणं आहेत, ज्यात पटकन सांगता येत नाही की, लताबाई की सुमनताई गातायत... एक द्वंद्व गीत आहे, ते तर कानात प्राण आणून ऐकलं तरीही सांगता येतं नाही… नेमकं कुणी काय गायलंय..."



वैभव मांगले यांनी म्हटलं की, सुरुवातीच्या काळात सुमन कल्याणपूर यांचा आवाज लताबाईंसारखा वाटत असल्याने अनेकदा दोघींमध्ये फरक ओळखणं कठीण जायचं. मात्र, याच गोष्टीचा त्यांच्या कारकिर्दीवर परिणाम झाला. "सुमनताई लताबाईंसारखं गायच्या, हेच त्यांचं दुर्भाग्य होतं. सुमनताई लता बाईंसारखं गातात हेच दुर्भाग्य होतं... साक्षात लताबाई असताना... सुमनताईंना कोण बोलवणार? याची सल त्यांना ही असणार, पण ताईंचं मोठे पण असं की, त्यांनी कधी हे कुठेही बोलून नाही दाखवलं… इतका सुज्ञपणा म्हणा किंवा दिलदारपणा म्हणा त्यांच्याजवळ नक्की होता… लताबाईंबरोबर त्याची मैत्री होती... त्यांचा आवाज लता बाईंसारखा जरूर होता... पण स्वर लगाव दोघींचे भिन्न होते... दमसास वेगळा होता... ," असं त्यांनी नमूद केलं.







तसेच, सुमनताईंनी कधीही याबाबत नाराजी व्यक्त केली नाही, उलट त्यांनी मोठेपणा आणि दिलदारपणा जपला, असंही मांगले यांनी सांगितलं. त्यांच्या मते, आवाजात साधर्म्य असलं तरी दोघींची गायनशैली आणि स्वरलगाव वेगळा होता. ८९ वर्षीय ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर (Suman Kalyanpur) यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वाने एक अजरामर आवाज गमावला आहे.

Comments
Add Comment

Rohit Sharma New Reality Show : क्रिकेटच्या मैदानावर सिक्सर मारणारा हिटमॅन आता टेलिव्हिजनचा TRP वाढवणार, रोहित शर्माचा नवा रिऍलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सर्वांचा लाडका 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटर रोहित शर्मा टीव्हीवर एक नवा रिएलिटी शो घेऊन येत आहे.

Badshah Isha Rikhi Divorce : अवघ्या ५ महिन्यांतच संपलं नातं! प्रसिद्ध गायक बादशाहचा घटस्फोट; सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ

प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी यांच्या नात्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या पाच

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या