Priya Bapat : वारंवार मेसेज, जवळीक साधण्याचा प्रयत्न; प्रिया बापटने सांगितला धक्कादायक किस्सा

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) सध्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळात आलेल्या एका अप्रिय अनुभवाबाबत तिने प्रथमच खुलासा केला आहे. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सहकलाकाराच्या वागण्यामुळे आपण अस्वस्थ झाल्याचे तिने सांगितले.


एका मुलाखतीत बोलताना प्रिया बापट म्हणाली की, तिला चित्रपटातील किसिंग सीनबाबत कधीच आक्षेप नव्हता. तो सीन करायचा नव्हता असा काही भाग नव्हता, तर चित्रपटाच्या कथेत तो कसा योग्य वाटेल, हा माझा प्रश्न होता. कारण तो तिथे फिट बसत नव्हता. संबंधित चित्रपटाच्या स्क्रिप्ट वाचनादरम्यान तिने दिग्दर्शकाला त्या सीनची गरज काय आहे, असा प्रश्नही विचारला होता. अखेरीस दिग्दर्शकाच्या सांगण्यावरून तिने तो सीन करण्यास होकार दिला.


मात्र, प्रत्यक्ष शूटिंगदरम्यान परिस्थिती वेगळीच झाली. प्रियाच्या म्हणण्यानुसार, गाण्याच्या चित्रीकरणावेळी संबंधित अभिनेत्याने सीनमध्ये बदल सुचवण्याच्या नावाखाली वारंवार वैयक्तिक मर्यादा ओलांडल्या. त्या काळात आपण इंडस्ट्रीत नवीन असल्यामुळे अशा प्रसंगी नेमकी कशी प्रतिक्रिया द्यावी, हे समजत नव्हते, असेही तिने सांगितले.



शूटिंग संपल्यानंतरही त्या अभिनेत्याकडून सतत मेसेज येत असल्याचा दावा प्रियाने या मुलाखतीत केला. एकत्र वेळ घालवण्याचे आणि भेटण्यासाठीचे अनेक मेसेज त्या अभिनेत्याकडून येत होते. मात्र, अनेकदा नकार देऊनही तो काही कारणं काढून बोलण्याचा प्रयत्न करत होता. सततच्या मेसेज मुळे मला काही मनस्ताह सहन करावा लागला. त्यानंतर या संपूर्ण घटनेबाबत त्यांनी उमेशला सांगितले. तेव्हा उमेश तिच्यासोबत हॉटेलमध्ये राहिला, जेणेकरून त्या अभिनेत्याला समजावं की ती एकटी नाही आणि त्याला त्याच्या मर्यादांची जाणीव होईल.


प्रिया बापट ही मराठी मनोरंजन विश्वातील एक आघाडीची अभिनेत्री आहे. तिने अनेक गाजलेल्या चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 'मुन्नाभाई एमबीबीएस', 'लगे रहो मुन्नाभाई', 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय', 'काकस्पर्श', 'टाइमपास 2' आणि 'वजनदार' यांसारख्या चित्रपटांतील तिच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत.


या मुलाखतीनंतर मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा कामाच्या ठिकाणी व्यावसायिक मर्यादा आणि कलाकारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेत आला आहे.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’