Crime News : तलाठ्याच्या आत्महत्येच्या घटनेत ट्विस्ट, बहिणीला रडत फोन केला अन... 'त्या' डायरीने गूढ वाढवलं

बीड : लग्नाला अवघे 12 दिवस झालेले असतानाच एका तरुण तलाठ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई (Ambajogai) शहरालगतच्या मोरेवाडी परिसरात घडली होती. या प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. मृत गणेश दत्तू कोळी (Ganesh Dattu Koli) यांच्या आईच्या तक्रारीवरून पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीचे कथित बाहेरील संबंध आणि मानसिक छळामुळेच मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आईने केला आहे.



पतीसोबत राहण्यास नकार


फिर्यादीनुसार, विवाहानंतर कुलदैवताच्या दर्शनासाठी गेले असताना गणेशला पत्नीच्या वागण्यात बदल जाणवू लागला. ती सतत कोणाशी तरी फोनवर लपून बोलत असल्याचा संशय त्याला आला होता. दरम्यान, घरातील सत्यनारायण पूजेनंतर पत्नीने हे लग्न तिच्या इच्छेविरुद्ध झाल्याचे सांगत गणेशसोबत राहण्यास नकार दिला आणि ती अंबाजोगाईला परत गेल्याचे तक्रारीत नमूद आहे.


गणेश २४ मे रोजी पत्नीला भेटण्यासाठी मोरेवाडी, अंबाजोगाई येथे आला. २५ मे रोजी त्याने आपल्या बहिणीला फोन करून रडत सांगितले की, पत्नीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असून तिने डायरीत तसे लिहून ठेवले आहे, जे त्याने वाचले आहे. यावरून त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर काही वेळातच गणेशने पत्नी राहत असलेल्या खोलीत गळफास घेतल्याची माहिती नातेवाइकांना मिळाली असे नमूद आहे.




डायरीने गूढ वाढवलं


२४ मे रोजी गणेश पत्नीला भेटण्यासाठी अंबाजोगाईतील मोरेवाडी येथे गेला होता. दुसऱ्याच दिवशी म्हणजे २५ मे रोजी त्याने आपल्या बहिणीला फोन करून रडत पत्नीचे दुसऱ्या तरुणासोबत संबंध असल्याचा संशय व्यक्त केला. पत्नीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असून तिने डायरीत तसे लिहून ठेवले आहे, जे त्याने वाचले, यावरून त्यांच्यात वाद झाला होता. असे त्याने बहिणीला सांगितले. त्यानंतर काही वेळातच गणेशने पत्नी राहत असलेल्या खोलीत गळफास घेतल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. (Beed Crime News)



संशयाने घेतला जीव ?


मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी पत्नी ड्युटीवर गेल्यानंतर गणेश घरात एकटाच होता. याच दरम्यान त्याने खोलीतील लोखंडी हुकाला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या (suicide) केल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.




अवघ्या १२ दिवसांत संसार मोडला


गणेश कोळी यांनी २०२१ मध्ये राज्य राखीव पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून सेवेला सुरुवात केली होती. नंतर त्यांनी तलाठी (Talathi) भरतीची तयारी करत २०२४ मध्ये चंद्रपूर (Chandrapur) येथे तलाठी पद मिळवले होते. १३ मे रोजी त्यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला होता. गणेशची पत्नी अंबाजोगाई येथील फॉरेन्सिक विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.


या घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. नवविवाहित जोडप्याच्या संसाराला अवघ्या १२ दिवसांत ग्रहण लागल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

NCP Core Committee Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची देवगिरी येथे महत्त्वपूर्ण बैठक; संघटनात्मक बांधणीवर चर्चा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईतील देवगिरी निवासस्थानी पार

Ashok Kharat Case : पीडित स्त्रियांवर...अशोक खरातच्या आज सुनावणीत न्यायालयात काय घडलं ?

Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने सर्वानाच हादरवून सोडले होते. भविष्य सांगण्याचा बहाणा करत भोंदू

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.