Bharat Bhagy Vidhata Movie:  ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटावर नर्सेस संघटनेचा आक्षेप; प्रदर्शनापूर्वीच निर्माण झाला वाद

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) आगामी ‘भारत भाग्य विधाता’ (Bharat Bhagy Vidhata) हा चित्रपट सध्या चर्चेत असून प्रदर्शनापूर्वीच तो वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. २ जून रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून १२ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र ट्रेलरमधील काही दृश्ये आणि संवादांवर नर्सेस संघटनांनी आक्षेप घेतला आहे.


‘भारत भाग्य विधाता’ हा चित्रपट २००८ मधील मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. कामा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या धैर्याची कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. कंगना रणौतसोबत मराठी अभिनेत्री गिरीजा ओक हिनेही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली असून दोघी नर्सच्या भूमिकेत दिसणार आहेत.


चित्रपटाचा ट्रेलर समोर आल्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनने काही दृश्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ट्रेलरमधील काही संवाद आणि प्रसंगांमुळे नर्सेसच्या व्यवसायाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखवली जात असल्याचा दावा संघटनेने केला आहे. नर्स हा आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाचा आणि सन्माननीय घटक असल्याने अशा प्रकारचे चित्रण समाजात चुकीचा संदेश देऊ शकते, असे संघटनेचे म्हणणे आहे.


यासंदर्भात फेडरेशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून चित्रपटातील आक्षेपार्ह वाटणारे संवाद आणि दृश्यांमध्ये बदल करण्याची मागणी केली आहे. तसेच चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी तो नर्सेस संघटनांच्या प्रतिनिधींना दाखवावा आणि त्यांच्या सूचनांचा विचार करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.


दरम्यान, चित्रपटाच्या निर्मात्यांकडून किंवा कलाकारांकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे या वादावर पुढे काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

3 Idiots Sequel : '3 इडियट्स'चे त्रिकुट परतणार; राजकुमार हिरानींचे संकेत

मुंबई : आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी यांची मुख्य भूमिका असलेला २००९ मधील सुपरहिट चित्रपट '3 इडियट्स'च्या

Jailer 2 release date : ‘जेलर २’ चित्रपट १५ ऑक्टोबरलाच होणार रिलीज; पुढे ढकलण्याच्या अफवांवर निर्मात्यांचा पूर्णविराम

सुपरस्टार रजनीकांत (Rajnikant) यांच्या बहुप्रतिक्षीत ‘जेलर २’ (Jailer 2) या चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत गेल्या काही

Nikki Arbaz Breakup : निक्की तांबोळी-अरबाज पटेलचा ब्रेकअप? अखेर सगळं सत्य समोर

मुंबई : ‘बिग बॉस मराठी’च्या 5 व्या सीझनमध्ये निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्या नात्याची जोरदार चर्चा झाली

Janhavi Killekar New Brand : अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने सुरू केला नवा प्रवास; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून दिली माहिती

मुंबई : जान्हवी किल्लेकरच्या चाहत्यांसाठी खास बातमी! ‘बिग बॉस मराठी’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आता

Rohit Sharma New Reality Show : क्रिकेटच्या मैदानावर सिक्सर मारणारा हिटमॅन आता टेलिव्हिजनचा TRP वाढवणार, रोहित शर्माचा नवा रिऍलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सर्वांचा लाडका 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटर रोहित शर्मा टीव्हीवर एक नवा रिएलिटी शो घेऊन येत आहे.

Badshah Isha Rikhi Divorce : अवघ्या ५ महिन्यांतच संपलं नातं! प्रसिद्ध गायक बादशाहचा घटस्फोट; सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ

प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी यांच्या नात्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या पाच