Samarth Panel : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत समर्थ पॅनेलचा दणदणीत विजय

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेलने एकहाती विजय मिळवत वर्चस्व कायम राखले आहे. थेट निवडणुकीसाठी झालेल्या १४ जागांपैकी सर्व १४ जागांवर समर्थ पॅनेलचे उमेदवार विजयी झाले, तर विरोधी चित्रकर्मी पॅनेलला एकही जागा मिळवता आली नाही.



महामंडळाच्या एकूण १७ जागांपैकी तीन जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित १४ जागांसाठी झालेल्या मतदानात सभासदांनी समर्थ पॅनेलच्या बाजूने स्पष्ट कौल दिला.



समर्थ पॅनेलचे विजयी उमेदवार : निर्माता विभागातून मेघराज राजेभोसले (९५१ मते) आणि सुनील महाजन (७८६ मते) विजयी झाले. दिग्दर्शक विभागातून दीपक कदम (८४६ मते) आणि अजित शिरोळे (७५६ मते) यांनी विजय मिळवला. लेखक विभागातून राज काजी (८५० मते), अभिनेता विभागातून सुशांत शेलार (८९१ मते), छायाचित्रण विभागातून धनाजी यमकर (९५२ मते) , नृत्य दिग्दर्शन विभागातून सुभाष नकाशे (८९२ मते), ध्वनिमुद्रण विभागातून शरद चव्हाण (९७५ मते), कला दिग्दर्शन विभागातून प्रवीण पाटील (८८५ मते), रंगभूषा विभागातून चैत्राली डोंगरे (९९८मते), निर्मिती व्यवस्थापन विभागातून रवींद्र गावडे (९१० मते), वितरण व प्रसिद्धी विभागातून गणेश गारगोटे (९०७ मते) आणि कामगार विभागातून विकास तोरणे (८८६ मते) विजयी झाले.



दरम्यान, अभिनेत्री विभागातून ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची बिनविरोध निवड झाली. तसेच संकलक विभागातून विजय खोचीकर आणि संगीत विभागातून गायक आनंद शिंदे हे बिनविरोध निवडून आले.



या निकालामुळे मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वावरील सभासदांचा विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून पुढील पाच वर्षांसाठी महामंडळाची धुरा समर्थ पॅनेलकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Comments
Add Comment

3 Idiots Sequel : '3 इडियट्स'चे त्रिकुट परतणार; राजकुमार हिरानींचे संकेत

मुंबई : आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी यांची मुख्य भूमिका असलेला २००९ मधील सुपरहिट चित्रपट '3 इडियट्स'च्या

Jailer 2 release date : ‘जेलर २’ चित्रपट १५ ऑक्टोबरलाच होणार रिलीज; पुढे ढकलण्याच्या अफवांवर निर्मात्यांचा पूर्णविराम

सुपरस्टार रजनीकांत (Rajnikant) यांच्या बहुप्रतिक्षीत ‘जेलर २’ (Jailer 2) या चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत गेल्या काही

Nikki Arbaz Breakup : निक्की तांबोळी-अरबाज पटेलचा ब्रेकअप? अखेर सगळं सत्य समोर

मुंबई : ‘बिग बॉस मराठी’च्या 5 व्या सीझनमध्ये निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्या नात्याची जोरदार चर्चा झाली

Janhavi Killekar New Brand : अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने सुरू केला नवा प्रवास; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून दिली माहिती

मुंबई : जान्हवी किल्लेकरच्या चाहत्यांसाठी खास बातमी! ‘बिग बॉस मराठी’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आता

Rohit Sharma New Reality Show : क्रिकेटच्या मैदानावर सिक्सर मारणारा हिटमॅन आता टेलिव्हिजनचा TRP वाढवणार, रोहित शर्माचा नवा रिऍलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सर्वांचा लाडका 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटर रोहित शर्मा टीव्हीवर एक नवा रिएलिटी शो घेऊन येत आहे.

Badshah Isha Rikhi Divorce : अवघ्या ५ महिन्यांतच संपलं नातं! प्रसिद्ध गायक बादशाहचा घटस्फोट; सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ

प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी यांच्या नात्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या पाच