US Apache Helicopter crashes : होर्मुज सामुद्रधुनीजवळ अमेरिकेचं ‘अपाचे’ हेलिकॉप्टर कोसळलं! मध्यपूर्वेत खळबळ; दोन्ही वैमानिकांचे थरारक रेस्क्यू

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे. जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी होर्मुज सामुद्रधुनी परिसरात अमेरिकन सैन्याचे अत्याधुनिक AH-64 Apache लढाऊ हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात हेलिकॉप्टरमधील दोन्ही वैमानिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले असून त्यांच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचे सांगितले जात आहे. (US Apache Helicopter crashes)


या दुर्घटनेमागे नेमके कारण काय आहे, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की त्यामागे कोणताही हल्ला किंवा सुरक्षा धोका होता, याचा तपास सुरू आहे. अमेरिकन प्रशासन आणि लष्कराकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. (US Apache Helicopter crashes)



मध्यपूर्वेतील तणावात अमेरिकेला मोठा धक्का :


इस्रायल-इराण संघर्षानंतर संपूर्ण मध्यपूर्वेत तणावपूर्ण परिस्थिती कायम आहे. या भागातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेने मोठ्या प्रमाणात लढाऊ विमाने, ड्रोन आणि हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या सर्वात प्रभावी लढाऊ हेलिकॉप्टरपैकी एक असलेल्या अपाचेच्या दुर्घटनेमुळे संरक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या संघर्षकाळात अमेरिकेची विविध विमाने आणि ड्रोन नुकसानग्रस्त झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र, अत्याधुनिक अपाचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त होण्याची ही दुर्मीळ घटना मानली जात आहे. (US Apache Helicopter crashes)




काही दिवसांपूर्वीच कमांडरचे उड्डाण :


या घटनेला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे कारण काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या मध्यवर्ती लष्करी कमांडचे प्रमुख ॲडमिरल Brad Cooper यांनी याच परिसरात अपाचे हेलिकॉप्टरमधून पाहणी केली होती. व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी राबवण्यात येणाऱ्या मोहिमेचा हा भाग होता. त्यामुळे या अपघातानंतर विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून सुरक्षा यंत्रणा आणि लष्करी तज्ज्ञ या घटनेकडे गांभीर्याने पाहत आहेत. (US Apache Helicopter crashes)



काय आहे अपाचे हेलिकॉप्टरची ताकद?


AH-64 Apache हे जगातील सर्वात घातक आणि अत्याधुनिक आक्रमक हेलिकॉप्टरपैकी एक मानले जाते. शत्रूची रणगाडे, लढाऊ वाहने, ड्रोन आणि हवाई लक्ष्यांवर अचूक हल्ला करण्याची क्षमता या हेलिकॉप्टरमध्ये आहे. 'हेलफायर' क्षेपणास्त्रे, अत्याधुनिक सेन्सर्स, रडार प्रणाली आणि रात्रीच्या कारवायांसाठीची क्षमता यामुळे अपाचेला आधुनिक युद्धातील महत्त्वाचे शस्त्र मानले जाते. समुद्रातील वेगवान हल्लेखोर नौकांवर कारवाई करण्यासाठीही त्याचा वापर केला जातो. (US Apache Helicopter crashes)



जगाचे लक्ष पुढील घडामोडींवर :


होर्मुज सामुद्रधुनी हा जगातील तेलवाहतुकीसाठी अत्यंत संवेदनशील समुद्री मार्ग मानला जातो. त्यामुळे या परिसरात घडलेल्या कोणत्याही लष्करी घटनेचे आंतरराष्ट्रीय परिणाम होऊ शकतात. अमेरिकन अधिकाऱ्यांकडून या दुर्घटनेची अधिकृत चौकशी सुरू असून, अपाचे हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेमागील खरे कारण काय होते याकडे आता जगभरातील संरक्षण तज्ज्ञ आणि राजनैतिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (US Apache Helicopter crashes)

Comments
Add Comment

इराणचा अणुकार्यक्रम पूर्णपणे उद्ध्वस्त? IAEA प्रमुखांच्या एका विधानामुळे उडाली खळबळ!

आल्बनी: अमेरिका आणि इस्रायलच्या भीषण हल्ल्यानंतर इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत एक अत्यंत मोठा आणि धक्कादायक

Somalia Attack: सोमालियात अल-कायदाशी संबंधित अल-शबाबच्या भीषण हल्ल्यात 20 सैनिकांचा मृत्यू, लष्कराच्या दाव्याने खळबळ

मोगादिशू: सोमालियाची राजधानी मोगादिशूमधून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. अल-कायदाशी संबंधित असलेल्या

Spain Train Accident : स्पेनमध्ये रेल्वेचा भीषण अपघात : दोन हाय-स्पीड ट्रेनच्या धडकेत ४६ जणांचा मृत्यू; माद्रिद-अंदालुसिया रेल्वे सेवा ठप्प!

माद्रिद : स्पेनच्या मध्यवर्ती भागात एका अत्यंत भीषण रेल्वे दुर्घटनेत किमान ४६ लोकांचा मृत्यू झाल्याची अतिशय

Cyclone Arnab News : बंगालच्या उपसागरात ''अर्णब'' चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागासाठी प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले 'अर्णब' (Cyclone Arnab) नावाचे चक्रीवादळ आता अधिकच भयानक रूप धारण करत आहे. हवामान

दुबईचा 'गोल्डन रोड'! 'त्या' मार्गाची नेमकी भानगड काय? जाणून घ्या

सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत आणि सामान्य व्यक्तीला ते घेणं परवडत देखील नाही. असं असताना दुबईत मात्र गोल्डन रोड

कॉम्प्युटर प्रिंटलाही लाजवेल असं हस्ताक्षर! नेपाळच्या प्रकृती मल्लाची जगभर चर्चा

आजकालच्या या फास्ट युगात पेनपेक्षा मोबाईल आणि कीबोर्ड जास्त हाताळले जातात. मुलं भराभर टायपिंग करतात, पण जेव्हा