Twin Tunnel Project : दुहेरी बोगदा प्रकल्पासाठी उच्चाधिकारी समितीकडून स्थळ पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : मुंबईच्या पूर्व आणि दक्षिण भागाला थेट जोडणारा ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पासाठी स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) जवळील छोटी चौपाटी येथे तांत्रिक इमारत बांधण्याचे प्रस्तावित आहे. या तांत्रिक इमारतीसाठी आवश्यक जागेची पाहणी करण्यासाठी उच्चाधिकार समितीने स्वराज्य भूमी परिसराला मंगळवारी ९ जून २०२६ रोजी भेट दिली. मफतलाल जलतरण तलाव येथील बास्केटबॉल मैदानाच्या ठिकाणी सदर इमारत बांधण्याबाबत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडी) पडताळणी करून त्याबाबतचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेला सादर करावा, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत.




यावेळी स्थळ पाहणी दौऱ्यात मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्यासह जिल्हाधिकारी (मुंबई शहर) आंचल गोयल, उच्चाधिकार समितीच्या सदस्या इंद्रायणी मलकानी, सहायक आयुक्त (डी विभाग)संतोष साळुंके, मत्स्य विभागाचे अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.



मुंबईतील पूर्व आणि दक्षिण भागाला थेट जोडणारा ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह दुहेरी बोगदा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा प्रकल्प आहे. पूर्व मुक्त मार्ग (इस्टर्न फ्री वे), अटल सेतू आणि मरीन ड्राइव्ह आणि मुंबई किनारी रस्ता यांना जोडणारा हा भूमिगत मार्ग सुमारे ९.२ ते १० किलोमीटर लांबीचा असून त्यापैकी सुमारे ७ किलोमीटर भाग भूमिगत आहे.



या प्रकल्पाअंतर्गत दोन स्वतंत्र बोगदे उभारले जात असून, त्यामध्ये वाहतुकीसाठी बहुपदरी मार्ग, आपत्कालीन सुविधा आणि अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था असेल. बोगदा वाहतुकीसाठी कार्यरत झाल्यानंतर ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह प्रवासाचा कालावधी सध्याच्या २२ ते ४० मिनिटांवरून सुमारे ५ मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्यास, पूर्व-पश्चिम दळणवळण सुधारण्यास तसेच वेळ आणि इंधनाची बचत होण्यास मोठी मदत होणार आहे.



या बोगद्याच्या कामकाजासाठी तांत्रिक इमारत बांधणे गरजेचे आहे. ही इमारत छोटी चौपाटी येथे प्रस्तावित आहे. गिरगाव चौपाटीवर कोणतेही बांधकाम उभारण्यासाठी उच्चाधिकारी समितीची पूर्व परवानगी आवश्यक असते. त्याअनुषंगाने महानगरपालिका मुख्यालयात उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष रफिक दादा व सचिव तथा अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ.अश्विनी जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक ८ जून २०२६ रोजी बैठक घेण्यात आली होती. गिरगाव चौपाटीऐवजी इतर ठिकाणी इमारत बांधण्याबाबत चाचपणी करता येईल का, तसेच त्यासाठी स्थळ पाहणी करावी, असे निर्देश बैठकीत दिले होते.


याअनुषंगाने गिरगाव चौपाटीऐवजी इतर ठिकाणी या प्रकल्पाची तांत्रिक इमारत बांधण्याबाबत चाचपणी करण्यासाठी उच्चाधिकारी समिती, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून मंगळवारी ९ जून २०२६ रोजी संयुक्त स्थळ पाहणी करण्यात आली.


उच्चाधिकार समितीने केलेल्या शिफारशीप्रमाणे मफतलाल जलतरण तलाव येथे असलेल्या बास्केटबॉल मैदानाच्या ठिकाणी सदर इमारत बांधता येण्यासाठी एमएमआरडीएद्वारे पडताळणी करण्यात यावी, अशी सूचना यावेळी करण्यात आली. त्यानंतर, यासंदर्भातील प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेला आणि त्यानंतर मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा उद्या निकाल

- आदित्य ठाकरे प्रतिवादी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई : दिशा सालियन