Sanjay Shirsat : मॅरेथॉन बैठकीत ऐतिहासिक निर्णय; उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘महाबोधी संकुल’

MUMBAI : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत असलेल्या वादावर अखेर तोडगा निघाला असून, या जागेचा विकास बिहारमधील जागतिक प्रसिद्ध बोधगया येथील महाबोधी संकुलाच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत या ठिकाणी आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल” उभारण्याचा तसेच त्यासाठी स्वतंत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.

या निर्णयामुळे स्थानिक स्तरावर निर्माण झालेल्या सर्व वाद-विवादांवर कायमचा पडदा पडला असून, सामाजिक ऐक्य, प्रज्ञा, करुणा आणि बंधुतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.यावेळी बैठकीला आनंदराज आंबेडकर देखील उपस्थीत होते.


तीन तासांची मॅरेथॉन बैठक; सर्व घटकांची मते जाणून घेत ऐतिहासिक निर्णय


वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेसंदर्भात विविध सामाजिक, कायदेशीर आणि तांत्रिक मुद्द्यांवरून निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी विशेष बैठकीचे आयोजन केले होते. तब्बल तीन तास चाललेल्या या बैठकीत संबंधित दोन्ही बाजूंचे प्रतिनिधी, स्थानिक घटक, सामाजिक संघटना तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान मंत्री शिरसाठ यांनी सर्व संबंधितांचे मत, भावना आणि भूमिका अत्यंत संवेदनशीलतेने ऐकून घेतल्या. “वाद कायम ठेवण्यापेक्षा या जागेचा समाजहितासाठी, राज्यहितासाठी आणि भावी पिढ्यांच्या दृष्टीने सकारात्मक वापर व्हावा,” यावर अखेर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले.


३० एकर जागेवर उभारणार आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल


बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी सांगितले की, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या जागेच्या सामाजिक आणि ऐतिहासिक महत्त्वाचा विचार करून येथे भव्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे बौद्ध संकुल उभारून या प्रश्नावर तोडगा काढावा, असे सुचवले होते. त्यानुसार शासनाने वालधुनी येथील सुमारे ३० एकर जागेवर ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

या संकुलामध्ये भव्य बुद्ध विहार, बौद्ध मठ, स्तूप, ध्यान केंद्र, अत्याधुनिक विपश्यना केंद्र उभारण्यात येणार असून, हे संकुल केवळ धार्मिक स्थळ न राहता जागतिक दर्जाचे ज्ञान, संस्कृती आणि संशोधनाचे केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे.

याशिवाय येथे आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शाळा, महाविद्यालय, जागतिक दर्जाचे ग्रंथालय, बौद्ध सांस्कृतिक संग्रहालय, डिजिटल रिसर्च सेंटर तसेच अभ्यासिका आणि प्रशिक्षण केंद्रेही उभारण्यात येणार आहेत.


स्वतंत्र विकास प्राधिकरणाची स्थापना


या संपूर्ण प्रकल्पाची अंमलबजावणी पारदर्शक, कालबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने व्हावी यासाठी शासनामार्फत स्वतंत्र “आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल विकास प्राधिकरण” स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री संजय शिरसाठ यांनी केली. सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे हे स्वतः लवकरच वालधुनी येथील जागेची पाहणी करणार असून, त्यानंतर तज्ज्ञ अभियंते आणि वास्तुविशारद यांच्या माध्यमातून संपूर्ण प्रकल्पाचा सविस्तर आराखडा (ब्ल्यू प्रिंट) तयार करून शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी आवश्यक निधी राज्य शासनाच्या आगामी मंत्रिमंडळ बैठकीत विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात येईल, अशी ग्वाही सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी दिली.
Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

Kanya Pujan 2026: कन्या पूजनसाठी 9 कन्या मिळाल्या नाही तर काय करायचं? काय सांगतं शास्त्र

शारदीय नवरात्री सुरू असून देवीच्या नऊ रुपांची मोठ्या भक्तिभावाने पूजन केलं जात आहे. या दरम्यान कन्या पूजनचं

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि