Gadchiroli Crime : संतापजनक घटना! चामोर्शीत ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; काही तासांतच आरोपीच्या मुसक्या आवळल्या

गडचिरोली : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील चामोर्शी येथून एक अत्यंत संतापजनक बातमी समोर आली आहे. घरात पेंटिंगचे काम करण्यासाठी आलेल्या एका २७ वर्षीय नराधम पेंटरने अवघ्या ७ वर्षांच्या चिमुकलीवर जबरदस्तीने अत्याचार (Abuse) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अवघ्या काही तासांतच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. (Crime News)



मिळालेल्या माहितीनुसार, पीडित ७ वर्षीय मुलगी आपल्या घराच्या स्लॅबवर खेळत होती. याच दरम्यान त्यांच्या घरी पेंटिंगचे काम सुरू होते. तिथे काम करणाऱ्या प्रज्वल नावाच्या २७ वर्षीय पेंटरने चिमुकलीला एकटे पाहून गैरफायदा घेतला. त्याने मुलीला बाजूला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या भयंकर प्रसंगानंतर घाबरलेल्या मुलीने तात्काळ आपल्या कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. हे ऐकताच पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली.


कुटुंबीयांनी वेळेचा अपव्यय न करता थेट चामोर्शी पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ६४(१), ६५(२) आणि पॉक्सो (POCSO) कायदा २०१२ च्या कलम ४ व ६ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्परता दाखवत काही तासांच्या आतच आरोपी प्रज्वलला अटक केली. आरोपीवर यापूर्वीही २०१९ मध्ये अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.





या घटनेचे पडसाद चामोर्शी शहरात उमटले असून विविध संघटनांच्या वतीने तीव्र निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी चामोर्शी पोलीस ठाण्यावर धडक देत पोलिसांना निवेदन सादर केले. "आरोपीविरुद्ध जलदगती न्यायालयात (Fast Track Court) खटला चालवून त्याला कठोर पाऊल उचलत फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा द्यावी," अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नागरिकांनी शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवत पीडित मुलीला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. या क्रूर घटनेनंतर पालकांमध्ये कमालीची भीती आणि संतापाचे वातावरण असून, आता पोलीस आणि न्यायालय या नराधमावर काय कठोर कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




Comments
Add Comment

Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.

Nanded Accident : सहस्त्रकुंड धबधबा पाहून परतताना काळाचा घाला; जीप झाडावर आदळली, 3 भाविकांचा मृत्यू

नांदेड : सहस्त्रकुंड धबधबा आणि महादेव मंदिराचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या जीपचा नांदेड

Pune Rain Alert : पुणेकरांनो, छत्री तयार ठेवा! पावसाचं पुन्हा आगमन; हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज

पुणे : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पुणे शहरात उकाडा आणि दमटपणात वाढ झाली आहे. ढगाळ