Magic of Science : आता 'मेंढीची लोकर' जोडणार मानवाची तुटलेली हाडे; संशोधनाला मोठे यश

LONDON: स्वेटर किंवा शालीसाठी वापरली जाणारी मेंढीची लोकर आता मानवी शरीराच्या उपचारासाठी वापरली जाणार आहे, हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु हे १००% सत्य आहे. लंडनमधील 'किंग्ज कॉलेज'च्या शास्त्रज्ञांनी एका अत्यंत महत्त्वाच्या संशोधनातून हाडांच्या उपचारांसाठी एक नवी दिशा शोधून काढली आहे.



'केराटिन'चा जादूई वापर


शास्त्रज्ञांनी मेंढीच्या लोकरीमध्ये नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या 'केराटिन' (Keratin) या प्रथिनाचा वापर करून एक विशेष 'पडदा' (Membrane) तयार केला आहे. विशेष म्हणजे, हे तेच केराटिन आहे जे मानवी नखे आणि केसांमध्ये नैसर्गिकरित्या अस्तित्वात असते. या प्रथिनावर प्रगत प्रक्रिया करून शास्त्रज्ञांनी हाडांच्या उपचारासाठी एक 'मॅजिक मेंब्रेन' विकसित केले आहे.



संशोधनातील यश


या प्रयोगाची चाचणी उंदरांच्या कवटीवरील अशा छिद्रांवर करण्यात आली, जी नैसर्गिकरित्या भरून येणे अशक्य मानले जात होते. या ठिकाणी केराटिनचा पडदा लावल्यानंतर काही आठवड्यांतच तिथे हुबेहूब नैसर्गिक हाडे पुन्हा तयार झाली. या यशामुळे भविष्यात मानवी हाडांच्या शस्त्रक्रियांमध्ये हे संशोधन 'गेम-चेंजर' ठरू शकते, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.




सध्याच्या उपचारांपेक्षा हे कसे वेगळे?


सध्या हाडांच्या उपचारांसाठी 'कोलाजेशन' (Collagen) चा वापर केला जातो, जो महागड्या प्रक्रियेचा भाग आहे आणि तितकासा मजबूतही नसतो. याउलट, मेंढीच्या लोकरीपासून तयार केलेल्या केराटिन पडद्याचे अनेक फायदे आहेत:





  • अधिक मजबूती: हे कोलाजेशनपेक्षा अधिक मजबूत आहे.




  • नैसर्गिक हाडांशी सुसंगत: हे नैसर्गिक हाडांच्या वाढीस उत्तम चालना देते.




  • स्वस्त पर्याय: हे अत्यंत स्वस्त असल्याने रुग्णांसाठी उपचारांचा खर्च कमी होऊ शकतो.






वैद्यकीय क्षेत्रात लोकरीचा नवा अवतार


एकेकाळी केवळ कापड उद्योगापुरती मर्यादित असणारी मेंढीची लोकर, आता विज्ञानाच्या कृपेने वैद्यकीय क्षेत्रात 'सोन्याचे मोल' मिळवताना दिसत आहे. नैसर्गिक फायबरच्या या उपयोगामुळे वैद्यकीय क्षेत्रात एक क्रांती घडण्याची चिन्हे आहेत.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे