Stand-up comedian Pranit More controversy : प्रणित मोरेच्या सर्व व्हिडिओंची सखोल तपासणी होणार

 गृह राज्यमंत्री पंकज भोयर; गृह विभागाकडून सायबर पोलिसांना आदेश जारी


मुंबई : अश्लील आणि विकृत विनोदांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. त्याच्या कार्यक्रमातील आक्षेपार्ह विधानांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर निर्माण झालेल्या तीव्र संतापाची दखल गृह विभागाने घेतली आहे. “प्रणित मोरे याने यूट्यूब व इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केलेल्या आजवरच्या सर्वच व्हिडिओ कंटेन्टची सायबर पोलिसांमार्फत सखोल चौकशी केली जाईल,” अशी माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली. समाजात अशा प्रकारचा विकृत विनोद कोणाकडूनही खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.



प्रणित मोरेच्या शोमधील काही व्हिडिओ अलीकडेच मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. यातील एका व्हिडिओमध्ये केईएम रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने मृतदेहाच्या गुप्तांगाविषयी अत्यंत बीभत्स विधान केले होते. तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये एका मुलाने सांगितलेला बिर्याणीचा किस्साही अत्यंत अश्लील होता. या प्रकारावर बोलताना गृहराज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले, “आपला देह मृत्यूनंतर समाजाच्या उपयोगी पडावा, या उदात्त हेतूने लोक देहदान करतात. अशा पवित्र भावनेचा अनादर करून मृतदेहाबद्दल अशी चुकीची आणि विकृत विधाने करणे अत्यंत निंदनीय आहे. केवळ हे दोनच व्हिडिओ नव्हे, तर यापूर्वी प्रणित मोरेच्या शोमधून जे काही आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आले आहेत, त्या सर्वांचीच सायबर सेल सखोल चौकशी करेल. या प्रकरणी संबंधित महिला डॉक्टरवरही कठोर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे”, असेही त्यांनी स्पष्ट केले.




महिला आयोगाची नोटीस
सातत्यपूर्ण अश्लील आणि विकृत संवादामुळे प्रणित मोरेचे शो नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिले आहेत. मात्र, यावेळी हा वाद मृतदेहांच्या विटंबनेपर्यंत आणि अश्लीलतेच्या मर्यादा ओलांडणारा ठरल्याने नेटकऱ्यांनी आणि विविध सामाजिक संघटनांनी या शोवर संपूर्ण बंदी घालण्याची मागणी लावून धरली आहे. दरम्यान, या गंभीर प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगानेही घेतली असून त्यांनी प्रणित मोरेला नोटीस बजावली आहे.

महिला आयोग आणि सायबर पोलीस एकाच वेळी या प्रकरणाचा समांतर तपास करत आहेत. चौकशीअंती या विकृत मानसिकतेवर कायद्याचा बडगा उगारून योग्य ती फौजदारी कारवाई निश्चितपणे केली जाईल.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म