Sanchita Ugale Suicide Case : संचिता उगलेच्या आत्महत्येचे सुशांत सिंग राजपूतशी कनेक्शन ?

अभिनेत्री संचिता उगलेच्या आत्महत्येबाबात तिच्या वडिलांनी संशय व्यक्त केला नसला तरी तिच्या चुलत भावाने एका इन्स्टाग्राम आयडीचा दाखला देत आत्महत्येबाबत संशय व्यक्त केला आहे. याप्रकऱणाची सखोल चौकशी करण्याची माणी त्याने केली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि संचिता या दोघांची आत्महत्या करण्याची तारीख १४ जून असून त्याचे कनेक्शन असल्याचा दावा संचिताच्या भावाने केला आहे.




टिव्ही मालिकेतील प्रसिध्द अभिनेत्री संचिता उगलेने रविवारी संध्याकाळी नालासोपारा येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. सोमवारी संचिताचा चुलत भाऊ आकाश उगले याने मात्र खळबळजनक आरोप केला आहे. संचिताच्या मृत्यूनंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू असताना मला इन्स्टाग्रामवर एक संशयास्पद आयडी आढळून आला होता." edit_.by_.riyu" नावाच्या या आयडीवर संचिताचाच प्रोफाईल फोटो लावण्यात आला आहे , असे त्याने सांगितले. संचिताने आत्महत्या केली त्याच दिवशी (१४ जून) या आयडीवरून एक रील पोस्ट करण्यात आली असल्याचे त्याने सांगितले.



या आयडीवर आलेल्या रीलमध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या क्लिप्स वापरण्यात आल्या असून त्यावर ‘इट्स अगेन १४ जून’ असे लिहिण्यात आले असून ‘वी मिस यु सुशांत सर’ असे कॅप्शन व्हिडिओला देण्यात आले आहे. ​या आयडीवरील सर्वात शेवटची पोस्ट २ जून २०२६ ची असल्याने, हा आयडी अगदी अलीकडेच तयार करण्यात आल्याचा आरोप आकाश याने व्यक्त केला. आत्महत्येपूर्वी माझी बहीण खूप घाबरली होती असेही त्याने सांगितले. तसेच सहा वर्षांपूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सिने विश्वात खळबळ उडाली होती. त्यानंतर १४ जून २०२६ रोजी अभिनेत्री संचिताने आत्महत्या केली आहे. यामागे योगायोग नसून निश्चित काहीतरी घडले आहे असा दावा आकाश उगले याने केला आहे.


पंतप्रधानांकडे चौकशीची मागणी


या इंडस्ट्रीमध्ये प्रचंड दबाव आणला जातो, धमक्या दिल्या जातात. जसं सुशांत सिंह राजपूतला आतून पोखरून काढलं, तसंच काहीसं माझ्या बहिणीसोबत घडलं आहे. आपल्या देशात पावर गेम चालतो, ज्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे जाणाऱ्या मुला-मुलींना दाबून टाकलं जातं. या इंडस्ट्रीमुळेच आज माझी बहीण आमच्यात नाही. त्यामुळे उच्चस्तरीय चौकशी करण्याची त्याने मागणी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे केली आहे.

Comments
Add Comment

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी