Nashik Accident News : लक्झरी बसची दुचाकीला जोरदार धडक; 2 तरुणांचा मृत्यू

Nashik Accident News : नाशिक शहरातील पंचवटी याठिकाणी भीषण अपघाताची घटना घडली आहे. पंचवटी परिसरात स्वामीनारायण पोलीस चौकीसमोरील महामार्गावर भरधाव लक्झरी बसने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. दुर्दैवी घटना बुधवारी पहाटे घडली असून अपघातानंतर बस चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला आहे.



नेमकं काय घडलं ?


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यज्ञराज काशीराम पांडे (वय २७, रा. पाथर्डी फाटा) आणि आयुष राजेंद्र कासार (वय २०, रा. चेहेडी, नाशिक रोड) हे दुचाकीवरून जात असताना बुधवारी पहाटे हा अपघात झाला. पहाटे सुमारे २.२५ वाजता स्वामीनारायण पोलीस चौकीसमोरील हायवेवर ‘हंसचाल’ कंपनीची एसी स्लीपर लक्झरी बस (AR 11 L 9002) भरधाव वेगाने जात होती. बस चालकाने वाहनावरील नियंत्रण न राखता पुढे असलेल्या टीव्हीएस स्टार सिटी दुचाकीला (MH 18 AE 6356) पाठीमागून जोरदार धडक दिली.


या धडक इतकी भीषण होती की धडकेत दुचाकीवरील दोन्ही तरुण गंभीर जखमी होऊन रस्त्यावर फेकले गेले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना दुर्दैवाने दोघांचाही मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने जखमींना मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.



पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


या प्रकरणी चेतन जगदीश भामरे (वय २२, रा. पाथर्डी फाटा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) अज्ञात बस चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक प्रकाश नेमाणे करीत आहेत.

Comments
Add Comment

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी