Election in Maharashtra : राज्यातील नगरपरिषदा/नगरपंचायतींमधील ३८ रिक्त जागांसाठी झाले मतदान, मतमोजणी रविवारी

मुंबई : राज्यातील १४ जिल्ह्यांतील ८ नगरपरिषदा व १४ नगरपंचायतींमधील एकूण ४७ रिक्त पदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. नामनिर्देशनपत्रे माघारी घेतल्यानंतर १० जिल्ह्यांतील ७ नगरपरिषदा आणि ७ नगरपंचायतींसाठी एकूण ३८ रिक्त जागांसाठी शनिवार २० जून २०२६ रोजी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत सरासरी ७१.८४ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे.



सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर नगरपरिषद / नगरपंचायतीकरिता ८१.४९ टक्के, नाशिक जिल्ह्यातील मनमाड नगरपरिषद / नगरपंचायतीकरिता ६६.५२ टक्के, बीड जिल्ह्यातील गेवराई नगरपंचायत / नगरपरिषदेकरिता ७६.३३ टक्के आणि अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपंचायत / नगरपरिषदेकरिता ७३.३३ टक्के तर अकोट नगरपंचायत / नगरपरिषदेकरिता ६७.३१ टक्के मतदान झाले. या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सरासरी ७२.१२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच, पोटनिवडणुकांमध्ये रायगड जिल्ह्यातील पाली नगरपरिषद / नगरपंचायतीकरिता ८५.३० टक्के, नाशिक जिल्ह्यातील पेठ नगरपरिषद / नगरपंचायतीकरिता ८४ टक्के, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर नगरपरिषद / नगरपंचायतीकरिता ६४.५४ टक्के, वाशिम जिल्ह्यातील मानोरा नगरपरिषद / नगरपंचायतीकरिता ७७.५७ टक्के आणि नागपूर जिल्ह्यातील हिंगणा नगरपरिषद / नगरपंचायतीकरिता ७६.३१ टक्के मतदान झाले. गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली नगरपरिषद / नगरपंचायतीकरिता ७५.०१ टक्के, कुरखेडा नगरपरिषद / नगरपंचायतीकरिता ८०.३७ टक्के आणि अहेरी नगरपरिषद / नगरपंचायतीकरिता ६१.५० टक्के मतदान झाले. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी नगरपरिषद / नगरपंचायतीमध्ये ७४.८५ टक्के मतदानाची नोंद झाली. या नगरपंचायत व नगरपरिषदांच्या पोटनिवडणुकांमध्ये सरासरी ७१.५५ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.



राज्यातील १४ जिल्ह्यांतील ८ नगरपरिषदा व १४ नगरपंचायतींमधील एकूण ४७ रिक्त जागांपैकी ८ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. तसेच, तीर्थपुरी नगरपंचायतीतील पोटनिवडणुकीसाठी एकही नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले नसल्याने उर्वरित ३८ जागांसाठी सार्वत्रिक व पोटनिवडणुका घेण्यात आल्या. यासाठी राज्यभरातील ५१ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ११ हजार ८२१ पुरुष आणि १० हजार ८५३ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर पोटनिवडणुकांमध्ये ३ हजार ३२४ पुरुष आणि ३ हजार ४१९ महिला मतदारांनी मतदान केले. सार्वत्रिक तसेच पोटनिवडणुकांची संपूर्ण प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली असून कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मतदान संपल्यानंतर सर्व मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रे सीलबंद करून सुरक्षा कक्षात जमा करण्यात आली आहे. या निवडणुकांची मतमोजणी उद्या, २१ जून रोजी सकाळी १० वाजल्यापासून करण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.


Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण