Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळा २०२७ च्या कामकाजासाठी श्रीमंत रामकिशोरदास शास्त्री यांची नियुक्ती

Nashik Kumbh Mela : आगामी नाशिक कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याशी संबंधित विविध कामकाजासाठी पंचवटी तपोवन येथील दिगंबर आखाड्यात महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय पंच दिगंबर अणी आखाडा यांच्या वतीने श्रीमंत रामकिशोरदास शास्त्री यांच्यावर कुंभमेळा व्यवस्थापनाशी संबंधित समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

कुंभमेळ्याच्या काळात आखाडे, खालसे तसेच स्थानिक मंदिरांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा, विविध अडचणी आणि प्रलंबित प्रश्न याबाबत शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे महत्त्वाचे कार्य श्रीमंत रामकिशोरदास शास्त्री पार पाडणार आहेत. तसेच संबंधित विभागांशी समन्वय साधून साधू-महंतांच्या अपेक्षा प्रशासनापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.



या नियुक्तीनंतर दिगंबर आखाडा श्री नाशिक क्षेत्र आद्य संत-महंत चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने श्रीमंत रामकिशोरदास शास्त्री यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, कुंभमेळ्याच्या नियोजनामध्ये साधू-संत, आखाडे, खालसे आणि स्थानिक धार्मिक स्थळांच्या सुविधा व समस्यांचा योग्य समन्वय होणे आवश्यक आहे. या दृष्टीने शास्त्री यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

कुंभमेळ्याशी संबंधित बैठका, प्रशासनाशी होणाऱ्या चर्चा तसेच विविध विकासकामांबाबत आखाड्यांचे प्रतिनिधित्व करण्याचे कार्यही ते करणार आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे संत-महंतांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या प्रसंगी श्रीमंत रामसनेहीदास, महंत श्री रघुनंदनदासजी, महंत श्री शंकरदास, महंत श्री विष्णूदास, महंत श्री माधवदास, महंत श्री रामकिशोरदास, महंत श्री रामबाबूदास, महंत नरसिंगदास, महंत चंद्रमदास यांच्यासह अनेक संत-महंत उपस्थित होते. तसेच हरिभक्त पारायण माधवदाची राठी यांचीही प्रमुख उपस्थिती होती.


कुंभमेळा समन्वयाची महत्त्वपूर्ण जबाबदारी


अखिल भारतीय पंच दिगंबर अणी आखाड्याचे श्रीमंत विष्णूदास महाराज व उपश्रीमहंत माधवदास यांच्या हस्ते श्रीमंत रामकिशोरदास शास्त्री यांची ही नियुक्ती करण्यात आली. सर्व आखाड्यांतील संत-महंतांशी त्यांचे सलोख्याचे संबंध असून कुंभमेळ्याच्या कामकाजात त्यांचा अनुभव आणि समन्वयक भूमिका उपयुक्त ठरणार आहे. त्यांच्या नियुक्तीचे विविध स्तरातून स्वागत होत आहे.
Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण