IAS Transfer : पी. वेलरासू यांच्यासह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने सोमवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि महापारेषणमधील तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.



पी. वेलरासू (२००२ बॅच) यांच्या १६ जून रोजीच्या बदली आदेशात अंशतः बदल करण्यात आला असून, आता त्यांची 'एमएमआरडीए'च्या अतिरिक्त महानगर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (२००३ बॅच) यांची मंत्रालयातील अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे. तर, 'एमएमआरडीए'चे अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार (२००४ बॅच) यांच्याकडे आता महापारेषणच्या (महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाची नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य