Samantha Ruth Prabhu : सामंथा रुथ प्रभूच्या घरी लवकरच नवा पाहुणा; अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, घेणार मॅटर्निटी ब्रेक

Samantha Ruth Prabhu : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू हिने अखेर तिच्या प्रेग्नन्सीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर शिक्कामोर्तब केले आहे. 'मा इंटी बंगारम' (Maa Inti Bangaaram) या चित्रपटाच्या यशानंतर आयोजित करण्यात आलेल्या सक्सेस मीटमध्ये सामंथाने आपण आई होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. पती राज निदिमोरूसोबत (Raj Nidimoru) ती त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाली आहे.



बेबी बंपची चर्चा रंगली अन...


गेल्या काही आठवड्यांपासून सामंथाच्या प्रेग्नन्सीच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले होते. 'मा इंटी बंगारम'च्या प्रमोशनल कार्यक्रमातील काही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या बेबी बंपची चर्चा रंगली होती. मात्र, याबाबत मौन बाळगणाऱ्या सामंथाने आता स्वतःच अधिकृत घोषणा करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.



सामंथा मॅटर्निटी ब्रेक घेणार


माध्यमांशी संवाद साधताना सामंथाने सांगितले की, सध्या हाती असलेली व्यावसायिक कामे पूर्ण झाल्यानंतर ती काही काळ अभिनयापासून दूर राहणार आहे. “'मा इंटी बंगारम'नंतर माझ्या प्रकृतीनुसार मला थोडा विराम घ्यावा लागेल. मी मॅटर्निटी लिव्हवर (Maternity Leave) जाणार आहे. त्यानंतर नव्या जोमाने आणि नव्या चित्रपटासह पुन्हा प्रेक्षकांसमोर येईन,” असे ती म्हणाली.



सामंथाच्या या घोषणेनंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात तिचे अभिनंदन केले. चाहत्यांकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी तिच्या शेजारी बसलेले राज निदिमोरूही (Raj Nidimoru) आनंद व्यक्त करताना दिसले. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या दिग्दर्शिका बी. व्ही. नंदिनी रेड्डी यांनीही सामंथाच्या आयुष्यातील या नव्या पर्वाबाबत भाष्य केले होते. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “आमचा चित्रपट यशस्वी ठरत असतानाच सामंथाच्या आयुष्यात आलेली ही आनंदाची बातमी अतिशय सुंदर वेळेत आली आहे.”असे त्यांनी म्हटले होते.


सामंथाने २०१७ मध्ये अभिनेता नागा चैतन्यसोबत विवाह केला होता. मात्र, २०२१ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर सामंथाने दिग्दर्शक-निर्माता राज निदिमोरूसोबत १ डिसेंबर २०२५ रोजी इशा योगा सेंटरमध्ये विवाह केला. आता लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच या जोडप्याने चाहत्यांना गोड बातमी दिल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’