Mirzapur The Movie Teaser : 'मिर्झापूर: द मुव्ही'चा धमाकेदार टीझर रिलीज

Mirzapur The Movie Teaser : 'मिर्झापूर' चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली असून 'मिर्झापूर: द मुव्ही'चा (Mirzapur The Movie) बहुप्रतीक्षित टीझर प्रदर्शित झाला आहे. ओटीटीवर प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या या क्राईम-ड्रामा विश्वाची आता मोठ्या पडद्यावर एंट्री होत असून, टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.

२०१८ मध्ये सुरू झालेल्या 'मिर्झापूर'च्या प्रवासाने भारतीय प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप सोडली. आता या गाजलेल्या मालिकेची कथा चित्रपटाच्या माध्यमातून आणखी मोठ्या आणि भव्य स्वरूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.



टीझरमध्ये अली फजल, पंकज त्रिपाठी आणि दिव्येंदू यांची दमदार झलक पाहायला मिळते. विशेष म्हणजे, 'बबलू पंडित'ची भूमिका साकारणारा दिव्येंदू पुन्हा एकदा या विश्वात परतताना दिसत आहे. याशिवाय अभिनेता रवी किशन यांचीही दमदार उपस्थिती कथेला नवा आयाम देताना दिसते.


'मिर्झापूर: द मुव्ही'ची कथा पूर्वांचलच्या गल्लीबोळांपासून राजस्थानच्या वाळवंटांपर्यंत विस्तारलेली दिसणार आहे. चित्रपटात अॅक्शन, सत्ता संघर्ष, सूड आणि राजकारणाचा तडका अधिक भव्य स्वरूपात पाहायला मिळणार असल्याचे टीझरवरून स्पष्ट होते.





निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मिर्झापूर: द मुव्ही' हा चित्रपट ४ सप्टेंबर २०२६ रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी चित्रपट हिंदीसोबतच तेलुगू भाषेतही रिलीज केला जाणार आहे.


टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटत असून, 'मिर्झापूर'चे जग पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Comments
Add Comment

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी