Nashik Crime : हातात कोयता घेऊन सिन्नर बसस्थानकात दहशत ; संशयित आरोपी ताब्यात

Nashik Crime : नाशिकच्या सिन्नर येथील बसस्थानक (Bus station)परिसरात मंगळवारी एक युवक हातात कोयता घेऊन दहशत माजवत होता. धक्कादायक म्हणजे त्याने सिटीलिंक बसच्या (Citylink Bus) काचेवर थेट कोयत्याने वार केले होते. हे दृश्य काही नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केले होते. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला. दरम्यान पोलिसांनी तातडीने कारवाई करीत संशयित आरोपीला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.



घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं ?


मंगळवारी आकाश देवीदास गोळेसर (Akash Devidas Golesar) (२६, रा. भोईगल्ली, सिन्नर) हा युवक मद्याच्या नशेत सिन्नर बसस्थानक (Sinnar Bus Station) परिसरात आला होता. त्याच्या हातात लोखंडी कोयता होता. बसस्थानकातील स्वच्छतागृह परिसरात त्याने कोयता घेऊन फिरत नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले. त्यानंतरही तो बसस्थानक परिसरातच फिरत होता, धक्कादायक म्हणजे त्याने थेट सिटीलिंक बसच्या चालकाला शिवीगाळ करत धमकावले.


संशयित आकाशने हातातील कोयता दाखवत चालकाला घाबरविण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर तर त्याने थेट सिटीलिंक बसच्या काचेवर कोयत्याने वार केल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत होते. या प्रकारामुळे बसस्थानक परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, परिसरातील काही युवकांनी संशयित आरोपीच्या हालचाली मोबाइलमध्ये चित्रित केल्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. व्हिडीओ समोर आल्यानंतर सिन्नर पोलिसांनी तत्काळ दखल घेत आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी शोधमोहीम राबवून त्याला ताब्यात घेतले.



संशयिताची पोलिसांनी काढली धिंड


सिन्नर पोलिसांनी सिन्नरच्या बसस्थानक परिसरात हातात कोयता घेऊन दहशत पसरविणाऱ्या युवकाला अटक केल्यानंतर त्याला घटनास्थळी आणले. यावेळी त्याची धिंड काढत नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असे त्याच्याकडून म्हणवून घेतले तर यापुढे असा गुन्हा करून जनतेला त्रास देणार नसल्याचेही सांगितले. पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांनी या युवकाची बस स्थानक परिसरात परेड घडवून आणली.



एक दिवसाची पोलिस कोठडी


दहशत माजवल्याप्रकरणी पोलिस अंमलदार प्रशांत चंद्रभान सहाने यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात (Sinnar Police Station) फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा तसेच महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी संशयिताकडून सुमारे ५०० रुपये किमतीचा लोखंडी कोयता जप्त केला आहे. अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास सिन्नर पोलिस करीत आहेत.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण