Nashik : जिल्ह्यात लवकरच दोन अपर तहसील कार्यालये, 'याठिकाणी' असणार मुख्यालय

Nashik : नाशिक जिल्ह्यातील महसुली प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने सिन्नर व लासलगाव (Sinnar and Lasalgaon) येथे स्वतंत्र अपर तहसील कार्यालये (Tehsil Office) स्थापन करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने पुढे आणला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर सूचना प्रसिद्ध करून नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. प्रस्तावित अपर तहसील कार्यालयांमुळे स्थानिक नागरिकांना महसुली कामांसाठी तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी वारंवार हेलपाटे मारण्याची गरज कमी होणार आहे.



सिन्नर व लासलगाव येथे प्रस्ताव


महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार प्रस्तावित अपर तहसील कार्यालयांचे मुख्यालय सिन्नर व लासलगाव येथे निश्चित करण्यात येणार आहे. महसूल व वन विभाग, मंत्रालयातील सहसचिव यांनी २१ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या पत्रानुसार नवीन कार्यालयांचे मुख्यालय व कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी सुधारित माहिती व नकाशे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने हा प्रस्ताव तयार केला आहे. लासलगाव आणि सिन्नर येथे स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालयाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. लासलगाव हे कांदा बाजारपेठेसाठी (Lasalgaon Onion Market) प्रसिद्ध असून परिसरात द्राक्षशेती व कृषी व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे.



तसेच सिन्नर परिसरात वाढते औद्योगिकीकरण, एमआयडीसीचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या यामुळे महसुली कामांचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही ठिकाणी अपर तहसील कार्यालयाची आवश्यकता निर्माण झाली आहे. प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असून शासनाची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर दोन्ही नवीन कार्यालये कार्यान्वित करण्यात येणार आहेत. प्रस्तावानुसार सिन्नर तहसील व अपर तहसील कार्यक्षेत्रात एकूण १२ महसूल मंडळांचा समावेश होणार आहे, तर लासलगाव तहसील व अपर क्षेत्रात ११ महसूल मंडळांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे एकूण २३ महसूल मंडळांतील नागरिकांना या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे.



नागरिकांना होणारा फायदा असा


नवीन अपर तहसील कार्यालयांमुळे महसुली प्रशासनाचे विकेंद्रीकरण होणार असून लासलगाव व सिन्नर परिसरातील नागरिकांची अनेक कामे स्थानिक पातळीवरच पूर्ण होणार आहेत. सातबारा उतारा, फेरफार नोंदी, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले यांसारख्या कामांसाठी नागरिकांना निफाड किंवा सिन्नर तालुका मुख्यालयात जाण्याची गरज कमी होईल. त्यामुळे नागरिकांचा वेळ, प्रवासाचा खर्च आणि त्रास वाचणार आहे. त्यामुळे नागरिकांचे शासकीय कार्यालयातील हेलपाटे कमी होण्यास मदत होईल. कार्यक्षेत्र विभागल्यामुळे महसूल कार्यालयांवरील कामाचा ताण कमी होऊन नागरिकांना अधिक जलद व प्रभावी सेवा मिळणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना जवळच्या ठिकाणी शासकीय सेवा उपलब्ध होणार असल्याने प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संपर्क अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Nashik News : समृध्दी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना, लुटीच्या घटनांनंतर पोलीस सतर्क

Nashik News : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या

NCP Core Committee Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची देवगिरी येथे महत्त्वपूर्ण बैठक; संघटनात्मक बांधणीवर चर्चा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईतील देवगिरी निवासस्थानी पार

Ashok Kharat Case : पीडित स्त्रियांवर...अशोक खरातच्या आज सुनावणीत न्यायालयात काय घडलं ?

Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने सर्वानाच हादरवून सोडले होते. भविष्य सांगण्याचा बहाणा करत भोंदू

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.