FIFA World Cup : FIFA वर्ल्ड कपच्या नावाखाली कोट्यवधींचा ऑनलाइन सट्टा! नाशिक सायबर पोलिसांची धडक कारवाई; 5 ताब्यात

FIFA World Cup : सध्या जगभरात फिफा फुटबॉल वर्ल्ड कपचा उत्साह सुरु आहे. याचाच गैरफायदा घेत ऑनलाइन सट्टा चालवणाऱ्या आंतरराज्यीय बेटिंग रॅकेटचा(Interstate betting racket) नाशिक शहर सायबर पोलिसांनी मोठा पर्दाफाश केला आहे. तांत्रिक सायबर पेट्रोलिंगच्या माध्यमातून या रॅकेटचा माग काढत पोलिसांनी कळवण तालुक्यातील वडनेरदुमाला (Vadnerdumala) परिसरात छापा टाकून संपूर्ण बेटिंग सेंटर उद्ध्वस्त केले. या प्रकरणात प्राथमिक तपासात तब्बल दीड कोटी रुपयांचे संशयास्पद आर्थिक व्यवहार उघडकीस आले असून गुजरातच्या मुख्य बुकीसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.



नेमकं काय घडलं ?


सायबर पोलीस ठाण्यातील (Cyber ​​Police Station) अमलदार भूषण देशमुख आणि दर्शन सोनवणे हे सोशल मीडिया व इंटरनेटवर नियमित सायबर पेट्रोलिंग करत असताना त्यांना वडनेरदुमाला परिसराशी संबंधित काही संशयास्पद ऑनलाइन लिंक्स आणि आयपी अ‍ॅड्रेस आढळले. या तांत्रिक माहितीचा गोपनीय पद्धतीने माग काढत सायबर पोलिसांनी गंगा निवास येथे छापा टाकला. कारवाईदरम्यान ऑनलाइन सट्टा चालवणारे संपूर्ण नेटवर्क उघडकीस आले.


तपासात आरोपी रेड्डी ४१० ब्रँच, क्रिकबेट ९९, ११एक्स आणि प्ले कॅसिनो या बेकायदेशीर वेबसाइट्सद्वारे ऑनलाइन बेटिंग चालवत असल्याचे समोर आले. ग्राहकांकडून क्यूआर कोडच्या माध्यमातून पैसे स्वीकारले जात होते. हे व्यवहार लपवण्यासाठी रक्कम ५४ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये फिरवली जात होती आणि त्यानंतर एटीएमद्वारे पैसे काढले जात होते. आतापर्यंत सुमारे दीड कोटी रुपयांचे व्यवहार पोलिसांच्या रडारवर आले आहेत.



रॅकेटमागे आणखी मोठे मास्टरमाइंड ?


छाप्यात पोलिसांनी चार लॅपटॉप, १८ मोबाईल फोन, ५४ बँक पासबुक, चार राऊटर, २५ एटीएम कार्ड आणि २६ सिमकार्ड जप्त केले आहेत. आरोपी केवळ कमिशनवर काम करत होते की या रॅकेटमागे आणखी मोठे मास्टरमाइंड आहेत, याचा सायबर पोलीस सखोल तपास करत आहेत.


पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके आणि सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या पथकाने ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये गुजरातच्या साबरकंठा येथील मुख्य बुकी पठाण अरबाज खान फरीद खान (२३), अरबाज शब्बीर शेख (२७, देवळाली), आसीफ जाफर हुसेन (४२, लासलगाव), पंकज नामदेव आहेर (३४, पाथर्डी रोड, नाशिक) आणि सागर रमेश कांबळे (३८, कोल्हापूर) यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण