Fairness Cream : धक्कादायक! गोरं करणारी क्रीम ठरतेय धोकादायक; क्रीम वापरल्याने होतोय कायमचा किडणी किंवा गंभीर त्वचाविकार

- डॉक्टरांनी महत्वाची बातमी


Fairness Cream : गोरं दिसण्याच्या हव्यासापोटी फेयरनेस क्रीमचा सर्रास वापर करणाऱ्यांसाठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्वचा गोरी करण्याचा दावा करणाऱ्या अनेक फेयरनेस क्रीम्समुळे किडनी निकामी होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. अशा क्रीमचा वापर केल्यानंतर अनेक तरुणांना गंभीर किडनीच्या आजारामुळे रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे समोर आले आहे. (Fairness Cream)



फेयरनेस क्रीममुळे किडनी कशी खराब होते?


तज्ज्ञांच्या मते, अनेक अनधिकृत आणि बनावट फेयरनेस क्रीम्समध्ये त्वचा तात्पुरती गोरी दिसावी म्हणून 'पारा' (Mercury) हा अत्यंत विषारी धातू मिसळला जातो. हा पारा त्वचेद्वारे शरीरात शोषला जातो आणि रक्तातून थेट किडनीपर्यंत पोहोचतो. त्यामुळे किडनीची गाळण्याची क्षमता कमी होते आणि ग्लोमेरुलोनेफ्रायटिस (Glomerulonephritis) सारखे गंभीर आजार होऊन किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो. (Fairness Cream)



विशेष म्हणजे, काही बेकायदेशीररीत्या विकल्या जाणाऱ्या किंवा परदेशातून तस्करीने आणल्या जाणाऱ्या फेयरनेस क्रीम्समध्ये पाऱ्याचे प्रमाण सुरक्षित मर्यादेपेक्षा हजारो पटीने अधिक असल्याचेही तज्ज्ञांनी नमूद केले आहे. (Fairness Cream)



'ही' लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या :


- लघवीचे प्रमाण अचानक कमी होणे किंवा लघवीत फेस येणे.
- पाय, चेहरा आणि डोळ्यांभोवती सूज येणे.
- सतत थकवा जाणवणे आणि भूक मंदावणे.
- त्वचेला तीव्र खाज सुटणे.


अशी लक्षणे दिसल्यास लगेच त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. (Fairness Cream)



क्रीम लावण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक :


तज्ज्ञांनी नागरिकांना कोणतीही फेयरनेस किंवा त्वचा उजळवणारी क्रीम डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरू नये, असे आवाहन केले आहे. क्रीम खरेदी करताना त्यावरील घटकांची यादी काळजीपूर्वक तपासावी. त्यामध्ये Mercury, Mercurous Chloride किंवा Mercuric असे घटक असल्यास ती क्रीम वापरणे टाळावे.
तसेच, सोशल मीडियावरील जाहिराती, ब्युटीशियनचे सल्ले किंवा 'काही दिवसांत गोरेपणा' देण्याचा दावा करणाऱ्या अनधिकृत उत्पादनांपासून दूर राहण्याचेही डॉक्टरांनी नागरिकांना आवाहन केले आहे. (Fairness Cream)


त्यामुळे कोणतेही ब्युटी प्रॉडक्ट वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि अधिकृत, प्रमाणित उत्पादनेच वापरणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.


टीप :- (वरील माहिती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार देण्यात आली आहे.)

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा