BLO Visit :मुंबईत मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण सुरू, ३० जून ते २९ जुलैदरम्यान बीएलओ घराघरात जाणार

मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई (मुंबई शहर व उपनगरे) क्षेत्रात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ हाती घेण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) मतदारांच्या घरी भेट देणार असून, नागरिकांनी आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून या प्रक्रियेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले आहे.



या गृहभेटीदरम्यान बीएलओ मतदारांना गणना अर्ज उपलब्ध करून देतील. संबंधित अर्जामध्ये आवश्यक माहिती भरून स्वाक्षरीसह त्याची एक प्रत बीएलओंकडे जमा करावी लागणार आहे. प्रशासनाने नागरिकांना गृहभेटीपूर्वी मतदार सेवा पोर्टल किंवा ईसीनेट अॅप वर जाऊन स्वतःचा अथवा आई-वडिलांचा जुना मतदार नोंदणी तपशील (नाव, मतदारसंघ, भाग क्रमांक व अनुक्रमांक) शोधून ठेवण्याचे आवाहन केले आहे. यामुळे पुनरीक्षणाची प्रक्रिया अधिक जलद आणि सुलभ होणार आहे.



ज्या मतदारांचा किंवा त्यांच्या आई-वडिलांचा तपशील पूर्वीच्या मतदार यादीत उपलब्ध नसेल, त्यांनी जन्मदाखला, पासपोर्ट, दहावीचे किंवा अन्य शैक्षणिक प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, शासकीय किंवा सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी अथवा निवृत्तीवेतन ओळखपत्र, कुटुंब नोंदवही, शासनाने दिलेले जमीन किंवा घरवाटप प्रमाणपत्र, वनहक्क प्रमाणपत्र, राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा पुरावा, १ जुलै १९८७ पूर्वी बँक, टपाल, एलआयसी किंवा शासनाने जारी केलेले ओळखपत्र अथवा आधार कार्ड यापैकी कोणतेही एक कागदपत्र तयार ठेवावे. तसेच अलीकडील पासपोर्ट आकाराचे छायाचित्र देखील सोबत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मतदारांनी आपल्या नावाची पडताळणी निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा एसआयआर शोध सुविधेद्वारे करून घ्यावी. अधिक माहितीसाठी नागरिकांनी नजीकच्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा १८०० २२ १८५० या टोल-फ्री मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रशासनाने म्हटले आहे. प्रशासनाने नागरिकांना या विशेष पुनरीक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Eknath Shinde : मुंबईतील विमुक्त दिनाच्या परिषदेत ५२ समाजांची एकजूट

मुंबई : विमुक्त समाजाला सहानुभूतीची नव्हे, तर घटनात्मक हक्क, सन्मान आणि न्यायाची गरज आहे. स्थिर आणि चिंतामुक्त

India Semicon 2.0 Scheme : भारताची 1.27 लाख कोटींची सेमीकॉन योजना

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशात चिप निर्मितीच्या संपूर्ण यंत्रणेला प्रोत्साहन देण्यासाठी 1.27 लाख कोटी रुपये

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान