Devendra Fadnavis : व्यापक चर्चेअंतीच आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय घेणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; कायदा लादायचा सरकारचा उद्देश नाही


मुंबई : अनुसूचित जातींच्या (SC) आरक्षण उपवर्गीकरणाबाबत घाईघाईने कोणताही कायदा लादण्याचा राज्य सरकारचा उद्देश नाही. या संवेदनशील विषयावर समाजातील सर्व संबंधित घटकांना विश्वासात घेऊन, व्यापक आणि सविस्तर चर्चेअंतीच अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत मांडणी केली. कोणत्याही समाजघटकावर अन्याय करण्याचा सरकारचा मानस नसून मागे राहिलेल्यांना पुढे आणण्यासाठी उचित उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.



विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा उपस्थित केला. उपवर्गीकरणाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी मुंबईत समाजबांधवांचा मोठा मोर्चा निघाल्याच्या पार्श्वभूमीवर, 'बदर समिती'चा अहवाल सार्वजनिक केल्याशिवाय आणि सर्वांशी चर्चा केल्याशिवाय सरकारने कोणतेही विधेयक आणू नये, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका सभागृहासमोर स्पष्ट केली.सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातींमधील अधिक मागे राहिलेल्या घटकांना न्याय देण्याबाबत निर्देश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या याच निकालानुसार कर्नाटक आणि तेलंगणसारख्या काँग्रेसशासित राज्यांनी आपापल्या राज्यात उपवर्गीकरण करून कायदेही बनविले आहेत, याकडे मुख्यमंत्री फडणवीस (Chief Minister Fadnavis) यांनी विरोधी पक्षाचे लक्ष वेधले. मात्र, महाराष्ट्र सरकार कोणावरही निर्णय लादणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.



या प्रक्रियेच्या सद्यस्थितीबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की, उपवर्गीकरणाच्या अभ्यासासाठी राज्य सरकारने नेमलेल्या 'बदर समिती'चा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला होता. या अहवालावर सर्व स्तरांतून सूचना आणि हरकती मागवण्याची गरज भासल्याने, राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. सध्या या समितीमार्फत सूचना व हरकती मागवण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यावर रीतसर सुनावण्या घेतल्या जातील. ही प्रक्रिया पूर्ण पारदर्शक असेल आणि यात कोणावरही अन्याय होणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.




विरोधकांचा सभात्याग


मुख्यमंत्र्यांच्या या स्पष्टीकरणानंतर विधानसभा अध्यक्षांनी पुढील लक्षवेधी सूचना पुकारली. मात्र, हा विषय अतिशय गंभीर आणि संवेदनशील असल्याने विरोधकांनी यावर अधिक बोलू देण्याची मागणी लावून धरली. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सभागृहात जोरदार गदारोळ झाला. अध्यक्ष पुढील कामकाजाकडे वळल्याने आणि विरोधकांना बोलण्याची मागणी मान्य न झाल्याने, अखेर महाविकास आघाडीच्या सदस्यांनी सरकारच्या भूमिकेचा निषेध नोंदवत सभात्याग केला.

Comments
Add Comment

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी