Mumbai Hospital News : रूग्णालय प्रशासनाने अशा तंत्रज्ञानस्नेही पुढाकाराचा अवलंब करावा

महापालिका अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांचे निर्देश


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उपनगरीय रूग्णालयात आरोग्य क्षेत्रात काम करणारी यंत्रणा तसेच नागरिक यांच्यादृष्टीने सोयीची अशी तंत्रज्ञानस्नेही पुढाकार घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. दैनंदिन हजेरी, रुग्ण नोंदणी, आरोग्य सुविधा, औषध उपलब्धतता अशा विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधार घेऊन दैनंदिन काम सोपे करणे शक्य आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आरोग्य क्षेत्रातील कामगिरीचे मूल्यांकन करणेही शक्य होईल. त्यामुळे रूग्णालय प्रशासनाने अशा तंत्रज्ञानस्नेही पुढाकाराचा अवलंब करावा, असे निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांनी दिले.





अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता लवंगारे यांनी वांद्रे (पश्चिम) स्थित खुरशादजी बेहरामजी भाभा महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय येथे बुधवारी १ जुलै २०२६ सायंकाळी आकस्मिक भेट देऊन पाहणी केली. उपनगरीय रुग्णालयाच्या ठिकाणी हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम या प्रणालीची अंमलबजावणीचा वेग वाढवण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच तंत्रज्ञानाचा आधार घेतानाच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कामगिरीचे मूल्यांकन करण्याच्या अनुषंगाने पावले उचलण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. या भेटीदरम्यान प्राजक्ता लवंगारे यांनी पुरूष, महिला कक्ष, नवजात शिशू कक्ष आदी विभागांची आणि प्रसाधनगृहांची प्रत्यक्ष पाहणी केली. एचएमआयएस संगणकीय प्रणाली, औषधसाठा, रुग्णांची स्थिती, उपचार पद्धती आदींची माहिती जाणून घेतली. तसेच, उपनगरीय रुग्णालयाच्या कामगिरीचा तसेच क्षमतावाढीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या पुनर्विकास कामांचा आढावा घेतला. प्रमुख वैद्यकीय अधीक्षक चंद्रकांत पवार यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.



नागरिकांसाठी सुलभ अशी एचएमआयएस प्रणाली उपनगरीय रूग्णालयात उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आढावा त्यांनी या बैठकीच्या दरम्यान घेतला. या प्रणालीची अंमलबजावणी लवकरात लवकर कशा पद्धतीने करणे शक्य होईल, त्याअनुषंगाने आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश त्यांनी दिले. उपनगरीय रूग्णालयांमध्ये खुरशादजजी बेहरामजी भाभा महानगरपालिका सर्वसाधारण रूग्णालय, सिद्धार्थ महानगरपालिका सर्वसाधारण रूग्णालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका सर्वसाधारण रूग्णालय, पंडित मदनमोहन मालविय महानगरपालिका शताब्दी रूग्णालय (गोवंडी) याठिकाणी आरोग्य सेवा आणि पुनर्विकास कामांचा आढावादेखील यावेळी घेण्यात आला. रूग्णालय पायाभूत सुविधा कक्षाचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते. रुग्णालयाच्या पुनर्विकास कामांच्या ठिकाणी येणारे अडथळे, पुनर्विकासाचे टप्पे, मनुष्यबळ नेमणूक यासारख्या बाबींचा प्राजक्ता लवंगारे यांनी आढावा घेतला. तसेच विविध टप्प्यात सुरू असणारी पुनर्विकासाची कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

Comments
Add Comment

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या