Sairat fame Arbaz Shaikh : सैराट फेम अरबाज शेखच्या व्हिडिओची दखल; नोबेल हॉस्पिटलच्या मेडिकलवर कारवाई

सोलापूर: मराठीतील गाजलेल्या सैराट चित्रपटातील अभिनेता अरबाज शेख यांच्या तक्रारीनंतर सोलापुरातील नोबेल हॉस्पिटलशी संलग्न मेडिकलवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान गंभीर त्रुटी आढळून आल्याने संबंधित मेडिकलमधील औषधविक्री तातडीने बंद करण्यात आली. या कारवाईनंतर अरबाज शेख यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसद्वारे हा विषय आता आपल्यासाठी संपला असल्याचे सांगत सर्वांचे आभार मानले आहेत. (Sairat fame Arbaz Shaikh)



अरबाज शेख यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत त्यांच्या वडिलांच्या उपचारादरम्यान आलेला अनुभव मांडला होता. त्यांनी आरोप केला होता की, रुग्णांना हॉस्पिटलशी संलग्न मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्यास सांगितले जात होते. तसेच, सुरुवातीला १० हजार रुपयांची ठेव (डिपॉझिट) भरल्यानंतर सुमारे ४० हजार रुपयांहून अधिक किमतीची औषधे व इंजेक्शन्स त्याच मेडिकलमधून घेण्यास सांगण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता. या तक्रारीची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने नोबेल हॉस्पिटलशी संलग्न फातिमा फार्माची तपासणी केली. तपासणीदरम्यान गंभीर त्रुटी आढळल्याने संबंधित मेडिकलमधील औषधविक्री तात्पुरती बंद करण्याचे आदेश देण्यात आले. (Sairat fame Arbaz Shaikh)



दरम्यान, कारवाईनंतर अरबाज शेख यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले की, संबंधित व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर मोठ्या प्रमाणात फोन आणि संदेश येऊ लागल्याने तो व्हिडिओ हटविण्यात आला. तसेच प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई केल्याबद्दल समाधान व्यक्त करत, "सध्या माझ्या वडिलांची प्रकृती आणि कुटुंब माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाचे आहे. त्यामुळे हा विषय माझ्यासाठी इथेच संपला आहे. कठीण काळात साथ देणाऱ्या सर्वांचे आभार," असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, या प्रकरणामुळे खासगी रुग्णालयांमधील औषध खरेदीच्या पद्धती आणि रुग्णांच्या निवडीच्या अधिकाराबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. (Sairat fame Arbaz Shaikh)

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’