'Sairat' Actor Arbaz Shaikh : वडिलांच्या उपचारांसाठी 'सैराट' फेम अरबाज शेखची हाक; भावनिक व्हिडीओ व्हायरल

मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' (Sairat) चित्रपटातून घराघरात पोहोचलेला सल्या ही भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेख (Arbaz Shaikh) सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर (Social Media) त्याचा एक भावनिक व्हिडीओ (Video) मोठ्या प्रमाणावर व्हायरल (Viral) होत असून, त्यात तो वडिलांच्या उपचारांसाठी (Treatment) आर्थिक मदतीचं (Financial Help) आवाहन करताना दिसत आहे. तसेच एका खासगी रुग्णालयातील (Private Hospital) अनुभवाबाबतही त्याने गंभीर आरोप केले आहेत.


अरबाज शेखने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सांगितले की, त्याच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज (Brain Hemorrhage) झाल्यानंतर त्यांना सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर हृदयाशी संबंधित (Heart Problem) त्रास वाढल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, उपचारादरम्यान रुग्णालयाकडून औषधं (Medicines) केवळ त्यांच्या मेडिकलमधून (Medical Store) खरेदी करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप अरबाजने केला आहे.



अरबाजच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयात दाखल करताना सुरुवातीला १० हजार रुपयांचं डिपॉझिट (Deposit) भरावं लागलं. त्यानंतर आवश्यक औषधांची यादी देण्यात आली. ही औषधं बाहेरून आणण्याची परवानगी मागितली असता ती नाकारण्यात आली आणि रुग्णालयातील मेडिकलमधूनच औषधं घेण्यास सांगण्यात आलं. या औषधांचा खर्च ४० हजार रुपयांपेक्षा जास्त झाला. त्याच औषधांचा बाहेरचा खर्च जवळपास निम्मा असल्याचा दावा त्याने केला आहे.


भावनिक होत अरबाज व्हिडीओमध्ये म्हणतो, "माझ्या बापाला मला मरताना पाहायचं नाही, त्यांना वाचवायचंय. त्यामुळे मी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट (Shift) केलं. मला खूप वाईट अनुभव आला आहे. योग्य उपचार कुठे मिळतील, हे समजत नाही. कृपया मला मदत करा." असे म्हणताना त्याला अश्रू अनावर झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.


व्हिडीओसोबत शेअर केलेल्या पोस्टमध्येही अरबाज शेखने आपण सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत (Financial Crisis) असल्याचं सांगितलं आहे. वडिलांचा उपचार सुरू ठेवण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचं नमूद करत त्याने गुगल पे (Google Pay) क्रमांकही शेअर केला आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी आर्थिक मदत करावी किंवा ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर (Share) करावी, अशी विनंती त्याने चाहत्यांना केली आहे.


अरबाज शेखचा हा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, अनेकजण त्याच्या वडिलांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत, तर अनेकांनी मदतीसाठी पुढाकारही घेतला आहे.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’