Wimbledon 2026 Linda Nosková : २१ वर्षीय लिंडा नोस्कोव्हाचा विम्बल्डनवर ऐतिहासिक कब्जा! चेक अंतिम लढतीत मुचोव्हाचा पराभव करत पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद

विम्बल्डन २०२६ महिला एकेरी स्पर्धेत २१ वर्षीय चेक टेनिसपटू लिंडा नोस्कोव्हा (Wimbledon 2026 Linda Nosková) हिने शानदार कामगिरी करत आपल्या कारकिर्दीतील पहिलेच ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले. अखेरपर्यंत रंगलेल्या चेक विरुद्ध चेक अशा अंतिम सामन्यात नोस्कोव्हाने अनुभवी कॅरोलिना मुचोव्हा हिचा ६-२, ५-७, ६-३ अशा फरकाने पराभव करत प्रतिष्ठेची 'व्हीनस रोझवॉटर डिश' आपल्या नावावर केली. (Wimbledon 2026 Linda Nosková)


नोस्कोव्हाने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत पहिला सेट अवघ्या काही वेळात ६-२ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्येही ती विजेतेपदाच्या अगदी जवळ पोहोचली होती. मात्र, तिने सलग पाच मॅच पॉइंट्स गमावल्याने मुचोव्हाने जोरदार पुनरागमन करत सेट ७-५ असा जिंकला आणि सामना निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये नेला. (Wimbledon 2026 Linda Nosková)


तिसऱ्या सेटमध्ये मात्र नोस्कोव्हाने मानसिक खंबीरपणा दाखवत पुन्हा एकदा आपल्या खेळावर नियंत्रण मिळवले. अचूक सर्व्हिस, दमदार ग्राउंडस्ट्रोक्स आणि संयमी खेळाच्या जोरावर तिने ६-३ असा सेट जिंकत विम्बल्डनचे पहिले विजेतेपद आपल्या नावावर केले. या विजयासह ती ग्रँडस्लॅम विजेती बनण्याचे स्वप्न साकार करण्यात यशस्वी ठरली. (Wimbledon 2026 Linda Nosková)



या विजयामुळे लिंडा नोस्कोव्हा गेल्या चार वर्षांत विम्बल्डन महिला एकेरीचे विजेतेपद पटकावणारी तिसरी चेक टेनिसपटू ठरली आहे. यापूर्वी मार्केटा वोंद्रोसोव्हा (२०२३) आणि बार्बोरा क्रेजकोव्हा (२०२४) यांनीही हे मानाचे विजेतेपद जिंकले होते. त्यामुळे महिला टेनिसमध्ये चेक प्रजासत्ताकाचे सातत्यपूर्ण वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. (Wimbledon 2026 Linda Nosková)


या ऐतिहासिक अंतिम सामन्याला टेनिसविश्वातील अनेक दिग्गज उपस्थित होते. दोन वेळा विम्बल्डन विजेती पेट्रा क्विटोव्हा तसेच विक्रमी नऊ वेळा विम्बल्डन एकेरीचे विजेतेपद जिंकणाऱ्या दिग्गज मार्टिना नवरातिलोव्हा यांनी रॉयल बॉक्समधून सामना पाहिला. नवरातिलोव्हा या प्रिन्सेस ऑफ वेल्स केट यांच्यासोबत उपस्थित होत्या. सामन्यानंतर केट यांनी लिंडा नोस्कोव्हाला प्रतिष्ठेची विजेतेपदाची ट्रॉफी प्रदान केली. (Wimbledon 2026 Linda Nosková)



विशेष म्हणजे, लिंडा नोस्कोव्हा आणि कॅरोलिना मुचोव्हा या प्रतिस्पर्धी यापूर्वी सहकारी राहिल्या आहेत. दोघींनी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये महिला दुहेरी स्पर्धेत एकत्र खेळत चौथे स्थान मिळवले होते. मात्र यावेळी विम्बल्डनच्या अंतिम फेरीत त्या एकमेकींसमोर उभ्या ठाकल्या आणि अखेर युवा स्टार लिंडा नोस्कोव्हाने विजय मिळवत आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठा टप्पा गाठला. तिच्या या यशामुळे महिला टेनिसमध्ये नव्या सुपरस्टारचा उदय झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. (Wimbledon 2026 Linda Nosková)

Comments
Add Comment

MCA Captaincy : सिद्धेश लाड कडे मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईला सलग दुसऱ्या रणजी करंडक हंगामासाठी नवीन कर्णधार मिळणार आहे. अनुभवी फलंदाज सिद्धेश लाड २०२६-२७ च्या

Duleep Trophy Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं शतक अवघ्या ८ धावांनी हुकलं; सचिनचा 'तो' विक्रम मोडण्याची संधी गमावली

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) दमदार फलंदाजी करत सर्वांचे

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या