Pankaja Munde : खाते बदलांवरून महायुतीत मतभेद नाहीत

- मंत्री पंकजा मुंडे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्थ खात्याला योग्य न्याय


मुंबई : महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या खात्यांमधील संभाव्य फेरबदल आणि मंत्रिमंडळ विस्तारावरून सत्ताधारी पक्षांमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्टीकरण राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे ( Pankaja Munde) यांनी दिले आहे. "खातेबदल हा पूर्णपणे सरकारचा अंतर्गत आणि तांत्रिक विषय असून आमच्यामध्ये कोणताही वाद नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) हे राज्याचे अर्थ खाते अत्यंत योग्य आणि प्रभावी पद्धतीने सांभाळत असून, एक शेतकरी म्हणून मी स्वतः त्यांचे मनःपूर्वक आभार मानते," असे प्रतिपादन त्यांनी बुधवारी केले. ( Cabinet Expansion)



छत्रपती संभाजी नगरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. पंकजा मुंडे म्हणाल्या की, यंदा जुलै महिना सुरू झाला तरी अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही. पाऊस लांबल्यामुळे सरकारसमोर सर्वात मोठा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा, त्यानंतर शेतकऱ्यांच्या सिंचनाचा आणि मग उद्योगांच्या पाणीपुरवठ्याचा उभा ठाकला आहे. या संदर्भात दर मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री परिस्थितीचा सखोल आढावा घेत असतात. सद्यस्थितीत राज्यात केवळ ६५ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून, आता लवकरात लवकर चांगला पाऊस पडावा, अशी संपूर्ण राज्याला अपेक्षा आहे. पाऊस समाधानकारक झाल्यास कोमेजणारी पिके वाचतील आणि बळीराजाला मोठा दिलासा मिळेल.



कर्जमाफी आणि लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणास होत असलेल्या विलंबावरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेचा समाचार घेताना त्यांनी माध्यमांनाही खडे बोल सुनावले. "तुम्ही माध्यम आहात, विरोधी पक्ष नाही, त्यामुळे वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. कोणतीही मोठी शासकीय योजना जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच मिनिटाला लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकत नाहीत, त्यासाठी एक निश्चित शासकीय कायदेशीर प्रक्रिया असते. ही अत्यंत व्यापक स्तरावरील योजना असून यामध्ये लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यांची आणि सातबाऱ्यांची तांत्रिक पडताळणी करावी लागते. कालच मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्री जयकुमार रावल यांनी या संदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे. एवढ्या वेगाने काम करण्याची सवय महाराष्ट्राला आमच्याच सरकारने लावली आहे. जुलैअखेरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांचे प्रश्न तांत्रिकदृष्ट्या मार्गी लागतील आणि शेतकरी पूर्णपणे समाधानी होईल," असे त्यांनी स्पष्ट केले. (Politics)





लाडकी बहीण योजना बंद होणार नाही


'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' (Ladki Bahin Yojana) बंद पडणार असल्याच्या विरोधकांच्या आरोपांवर बोलताना पंकजा मुंडे यांनी ही योजना कायमस्वरूपी सुरूच राहणार असल्याची ग्वाही दिली. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणाऱ्या प्रत्येक रुपयाची अचूक नोंद सरकारकडे उपलब्ध आहे. प्रत्येक नागरिक कर (Tax) भरतो आणि तोच निधी विविध लोककल्याणकारी योजनांवर खर्च केला जातो. मात्र, काही अपप्रवृत्तींकडून एकाच योजनेचा दोन ते तीन वेळा चुकीच्या पद्धतीने लाभ घेण्याचे प्रकार समोर येत असल्याने, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी नावे वगळण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आगामी गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांना कोणतीही अडचण येऊ नये आणि पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी पर्यावरण विभागाने विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलाव तयार करण्याचे योग्य नियोजन केल्याचेही त्यांनी नमूद केले. ( Maharashtra Politics)

Comments
Add Comment

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Apple iPhone18 : iPhone 18 Pro, Pro Maxच्या प्री-ऑर्डरला विलंब? १२ सप्टेंबरपासून बुकिंग सुरू होण्याची शक्यता

मुंबई : ॲपलच्या आगामी iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Maxची उत्सुकता वाढली असून, या दोन्ही प्रीमियम मॉडेल्सच्या प्री-ऑर्डरची तारीख

Nashik Crime : समृद्धी महामार्गावरील दरोड्याप्रकरणी सात जण ताब्यात, ५ फरार आरोपींचा शोध सुरू

Nashik Crime : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Nashik News : समृध्दी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना, लुटीच्या घटनांनंतर पोलीस सतर्क

Nashik News : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या