Devendra Fadnavis : सुमार कामगिरी करणाऱ्यांना मुख्यमंत्री देणार नारळ?

- मंत्रिमंडळात फेरबदलांचे संकेत; चांगले काम करणाऱ्या मंत्र्यांचे 'प्रमोशन'


मुंबई : महायुती सरकारमध्ये सुमार कामगिरी करणाऱ्या आणि सातत्याने वादात राहणाऱ्या अकार्यक्षम मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्याची तयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी सुरू केली असून, चांगली कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना 'प्रमोशन' मिळण्याची दाट शक्यता आहे. महायुतीमधील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांतील सुमार कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांचा पत्ता कट होणार असल्याने सध्या सत्ताधारी गोटात हालचालींना वेग आला आहे. ( Maharashtra Cabinet Reshuffle)



केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पूर्ण झाल्यानंतरच राज्यातील या घडामोडींना गती येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. या फेरबदलात वादग्रस्त मंत्र्यांची गच्छंती होण्यासह भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही मंत्र्यांच्या खात्यांमध्येही मोठे फेरबदल केले जाऊ शकतात. दुसरीकडे, शिवसेनेच्या कोट्यातील कामगिरीत मागे पडलेल्या आणि सातत्याने वादात राहिलेल्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवून त्यांच्या जागी नव्या आणि कार्यक्षम चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे आपापल्या अधिकारात आपापल्या पक्षातील मंत्र्यांच्या कामगिरीचा अंतिम आढावा घेऊन हा निर्णय घेणार आहेत. ( Maharashtra Politics)


या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईत वेगवान हालचाली पाहायला मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे तातडीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निवासस्थान असलेल्या 'देवगिरी' बंगल्यावर दाखल झाले. या ठिकाणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे यांच्यात अत्यंत महत्त्वाची बैठक ( Cabinet Expansion) पार पडली असून, या बैठकीला ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ हे देखील उपस्थित होते. मंगळवारी रात्री 'वर्षा' बंगल्यावर सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत झालेल्या विस्तृत चर्चेची आणि संभाव्य खातेबदलांची माहिती घेण्यासाठीच ही तातडीची बैठक बोलावण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.  ( BJP Maharashtra)




वर्षा बंगल्यावर काय घडले?


दरम्यान, मंगळवारी रात्री ‘वर्षा’ बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील हे देखील उपस्थित असल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. मतदारसंघातील कामांसाठी ही भेट होती, असे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले असले, तरी यामागे काही वेगळी राजकीय गणिते आहेत, याबाबतही चवीचवीने चर्चा रंगवल्या जात आहेत.

Comments
Add Comment

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Apple iPhone18 : iPhone 18 Pro, Pro Maxच्या प्री-ऑर्डरला विलंब? १२ सप्टेंबरपासून बुकिंग सुरू होण्याची शक्यता

मुंबई : ॲपलच्या आगामी iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Maxची उत्सुकता वाढली असून, या दोन्ही प्रीमियम मॉडेल्सच्या प्री-ऑर्डरची तारीख

Nashik Crime : समृद्धी महामार्गावरील दरोड्याप्रकरणी सात जण ताब्यात, ५ फरार आरोपींचा शोध सुरू

Nashik Crime : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Nashik News : समृध्दी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना, लुटीच्या घटनांनंतर पोलीस सतर्क

Nashik News : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या