Nashik : डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया प्रतिबंधासाठी मनपाकडून जनजागृती, नागरिकांना प्रतिबंधात्मक उपायांचे आवाहन

नाशिक : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया यांसारख्या डासजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation)
सार्वजनिक आरोग्य (मलेरिया) विभागाने नागरिकांना आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याचे आवाहन केले आहे.


डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा प्रसार एडीस एजिप्टाय (Aedes aegypti) या डासामार्फत होतो. हा डास घरातील तसेच परिसरातील सात दिवसांपेक्षा अधिक काळ साचलेल्या स्वच्छ पाण्यात वाढतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात व परिसरात पाणी साचणार नाही, याची नियमित काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत विविध भागांमध्ये डासप्रतिबंधक औषध फवारणी, धूर फवारणी तसेच गप्पी मासे उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरू असून, यासाठी विभागनिहाय नियुक्त कर्मचाऱ्यांशी नागरिकांनी संपर्क साधावा.



डेंग्यू प्रतिबंधासाठी महत्त्वाच्या सूचना


आठवड्यातून एकदा घरातील सर्व पाण्याची भांडी, टाक्या व हौद स्वच्छ करून कोरडे करा.


कुलर, फ्रिजचा ट्रे, फुलदाण्या आणि कुंड्यांखालील प्लेटमध्ये पाणी साचू देऊ नका.


घराच्या परिसरातील जुने टायर, डबे, नारळाच्या करवंट्या, प्लास्टिकचे कप आदींची योग्य विल्हेवाट लावा.


पाण्याच्या टाक्या कायम झाकून ठेवा.


बांधकामस्थळे, बेसमेंट व गच्चीवर पाणी साचणार नाही, याची काळजी घ्या.


अंगभर कपडे परिधान करा आणि आवश्यक असल्यास डासप्रतिबंधक क्रीम किंवा जाळीचा वापर करा.


ताप, अंगदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे किंवा अंगावर पुरळ आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.


स्वतःहून औषधोपचार करू नका. विशेषतः डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक औषधे घेणे टाळा.


डासांची उत्पत्ती आढळल्यास किंवा धूर फवारणीची आवश्यकता असल्यास मनपाशी संपर्क साधा.



विभागनिहाय संपर्क


नाशिक पूर्व - १४, १५, १६, २३, ३० - महेंद्र कांबळे - ९१३००४७६२४


नाशिक पश्चिम - ७, १२, १३ - राजेश वाघ - ९९२१८०३४४७


पंचवटी - १, २, ३, ४, ५, ६ - रविंद्र राऊत - ९८३४३९२९९३


सातपूर - ८, ९, १०, ११, २६ - नारायण जाधव - ८६६८८७७६०६


नाशिक रोड - १७, १८, १९, २०, २१, २२ -अनंता वाघ - ९२६०१०१०४८


नवीन नाशिक (सिडको) - २४, २५, २७, २८, २९, ३१ - नदिमखान पठाण - ९८२२७४७४७०



"डेंग्यू व मलेरियाच्या प्रतिबंधासाठी महानगरपालिकेकडून सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात आणि परिसरात स्वच्छता राखून पाणी साचू न देणे हीच सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे. प्रशासन आणि नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नातूनच डासजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविता येईल."


मनिषा खत्री आयुक्त, नाशिक महानगरपालिका

Comments
Add Comment

मुंबई फटाक्यांनी पेटतेय! एकाच दिवसांमध्ये फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या १३७ घटना

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईत फटाक्यांच्या आतषबाजीवर न्यायालयाने निर्बंध घातलेले असताना त्यानुसार महापालिका

महापालिकेच्या विधी खात्यातील ३५ पदे कायमचीच केली रद्द, कनिष्ठ कायदा अधिकारीपासून ते फलक परिचरपर्यंतच्या पदांचा समावेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या विधी खात्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात असून महापालिका

रशिया-युक्रेन युद्धाचा तिढा सुटणार? पंतप्रधान मोदींच्या एका फोन कॉलने उडाली खळबळ, जगात मोठी चर्चा!

रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवण्यासाठी आता आंतरराष्ट्रीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. यातच भारताचे

इंग्लंड क्रिकेट संघात मोठा बदल! दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी अनकॅप्ड खेळाडूला थेट संधी, पाहा संपूर्ण संघ

England vs South Africa : इंग्लंड क्रिकेट संघाने आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी आपल्या कसोटी संघाची घोषणा केली आहे. डिसेंबर

कर्करोगविरोधी 1,364 औषधांच्या सुधारित एमआरपी लागू; ग्राहकांची वर्षाला ₹3,540 कोटींची बचत

नवी दिल्ली : कर्करोगाच्या रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने

'धीर सोडू नका, टोकाचा निर्णय घेऊ नको... शिवसेना तुमच्या पाठीशी' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेतकऱ्यांना ग्वाही

दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्याला पाठीशी उभं राहून धीर देण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे