महापालिकेच्या विधी खात्यातील ३५ पदे कायमचीच केली रद्द, कनिष्ठ कायदा अधिकारीपासून ते फलक परिचरपर्यंतच्या पदांचा समावेश

मुंबई महापालिकेने विधी खात्यातील कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी ३५ अनावश्यक पदे रद्द केली असून, त्याऐवजी २५ नवीन पदांची निर्मिती केली आहे. या सुधारित आकृतीबंधामुळे प्रशासकीय कारभारातील त्रुटी दूर होऊन कायदा विभागाच्या कामकाजाला अधिक गती मिळणार आहे.

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या विधी खात्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात असून महापालिका प्रशासनाने या खात्यांतील पदांमध्ये सुसुत्रता आणण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये खात्यांमधील अनावश्यक पदांची साफसफाई करून ती पदे काढून टाकली आहेत. अशाप्रकारे विधी खात्यातील तब्बल ३५ पदे कायमचीच रद्द करण्यात आली आहे. यामध्ये कनिष्ठ कायदा अधिकारीपासून ते फलक परिचर पर्यंतच्या पदांचा समावेश आहे.

मुंबई महापालिकेच्या विधी खाते अर्थात कायदा अधिकारी विभागाच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी यांची आकृतीबंध सुधारीत करण्याचा निर्णय घेण्यात आहे. या विधीखात्यामध्ये कायदा अधिकारीपासून वरिष्ठ विधी सहायक, लिपिक आणि हमाल आदींपर्यंतची एकूण ३५५ पदे असून त्यातील त्यातील एकूण ३५ पदे कमी करण्यात येत आहेत, तर २५ पदे नव्याने वाढवण्यात येणार आहे.

यामध्ये विधी खात्याच्या आस्थापनेवरील सहायक कायदा अधिकारी या संवंर्गातील ३२ अन अनुसुचित पदे व सहायक कायदा अधिकारी श्रेणी २ या संवंर्गातील २४ अन अनुसुचित पदे ही अनुसूचीवर घेण्यात येणार आहे. तसेच विधी खात्याच्या आस्थापनेवरील विविध संवंर्गातील एकूण ३५ अनुसुचित पदे ही त्वरीत खंडित येत आहे. खंडित करण्यात येणाऱ्या या पदांमध्ये कनिष्ठ कयदा अधिकारी(०४), प्रमुख चौकशी अधिकारी (०१), चौकशी अधिकारी (०५), वरिष्ठ विधी सहायक ( ०७), अधिक्षक न्यायालय(०२), अधिक्षक हस्तांतरण(०१), वरिष्ठ न्यायालयीन लिपिक (०१), लघुलेक उच्च श्रेणी(०२), लघुलेखक कनिष्ठ श्रेणी(१०), फलक परिचर (०२) आदींचा समावेश आहे.



तर २५ अनुसूचित पदे नव्याने निर्माण केली जाणार आहेत. यामध्ये 'सहायक कायदा अधिकारी' या संवर्गातील ०७ अनुसूचित पदे, 'सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-२)' ह्या संवर्गातील ०२ अनुसूचित पदे, 'मुख्य लिपिक' ह्या संवर्गातील ०१ अनुसूचित पद, 'कार्यकारी सहायक' ह्या संवर्गातील १२ अनुसूचित पदे व 'नाईक' ह्या संवर्गातील ०२ अनुसूचित पदे, 'उप कायदा अधिकारी' ह्या संवर्गाचे ०१ अनुसूचित पद अशी एकूण २५ अनुसूचित पदे नव्याने निर्माण करून आस्थापना अनुसूचीवर घेण्यात येणार आहे प्रस्ताविण्यात येत आहे.
Comments
Add Comment

प्रॉपर्टी कार्डवर अखेर मुंबई महापालिकेची नावे चढली, तब्बल १८९० भूभागांच्या मालमत्ता कार्डवर नाव नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या ताब्यात आज अनेक भूखंड असले तरी यातील बहुतांशी भूखंडांच्या मालमत्ता

IRCTC कडून मुंबईहून ‘टेम्पल ट्रेल्स ऑफ दक्षिण’ भारत गौरव विशेष पर्यटन रेल्वे चालवणार, अशी आहे योजना

मुंबई: भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ (IRCTC), पश्चिम विभाग, मुंबईतर्फे भारत गौरव विशेष पर्यटन

700 ग्रॅम बाळाचं वजन 3.3 कि.ग्रॅमवर नेलं; केईएम हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी बाळाला दिलं जीवनदान

मुंबई: मुंबईतील केईएम रूग्णालयातील डॉक्टरांनी एका बाळाला जीवनदान दिले आहे. आई 7 महिन्यांची गर्भवती असतानाच

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी! कुटुंबीयांना दिला मदतीचा विश्वास

महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत दिवाळी

नवी मुंबईतील गोळीबारात दोन तरुणी जखमी, पुढील उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात दाखल

नवी मुंबई: गेल्या आठवड्यामध्ये नवी मुंबईतील कोपर खैराणेमध्ये, दोन सख्ख्या बहि‍णींवर अंदाधुंद गोळीबार झाल्याची

दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांचा 'एक हात मदतीचा'

मुंबई, (विशेष प्रतिनिधी): महाराष्ट्राचा कणा असलेला बळीराजा आज निसर्गाच्या लहरीपणाशी आणि कठीण काळाशी झुंज देत आहे.