Dombivli Crime News : मॅट्रिमोनियल साइटवरून ओळख, 'लिव्ह-इन'चे आमिष अन् ५७ लाखांचा दणका

डोंबिवली : डोंबिवलीमध्ये (Dombivli) लिव्ह-इन रिलेशनशिप ( Live-in relationship) चे आमिष दाखवून ७३ वर्षीय ज्येष्ठ महिलेची तब्बल ५७ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक (Financial Fraud) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मॅट्रिमोनियल संकेतस्थळ (Matrimonial Website) वर ओळख करून विश्वास संपादन करत आरोपीने महिलेकडून टप्प्याटप्प्याने लाखो रुपये उकळले. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी दिल्लीतून एका आंतरराज्यीय भामट्याला अटक केली असून देशभरातील अनेक महिलांना अशाच पद्धतीने गंडा घातल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.



सोबतीच्या शोधात झाली ओळख


डोंबिवलीतील ७३ वर्षीय महिलेने आयुष्याच्या उत्तरार्धात सोबती मिळावा या उद्देशाने एका मॅट्रिमोनियल संकेतस्थळावर (Matrimonial Website) नोंदणी केली होती. त्याच माध्यमातून तिची ओळख अनुज संतोष तिवारी उर्फ अनुज सिंग उर्फ अनुज त्रिवेदी याच्याशी झाली. सुरुवातीला आरोपीने गोड बोलून विश्वास जिंकला आणि लिव्ह-इन रिलेशनशिप (Live-in Relationship) मध्ये राहण्याचे आश्वासन दिले.



विश्वास संपादन करून उकळले ५७ लाख


ओळख वाढल्यानंतर आरोपीने घरगुती अडचणी, वैद्यकीय खर्च आणि इतर कारणे सांगत महिलेकडून वेळोवेळी पैसे मागितले. महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवून विविध टप्प्यांत तब्बल ५७ लाख रुपये दिले. पैसे मिळाल्यानंतर आरोपीने संपर्क तोडला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले.



आयुष्यभराची पुंजी संपली, वृद्धाश्रमाची वेळ


या फसवणुकीत महिलेची आयुष्यभराची जमा केलेली रक्कम संपुष्टात आली. आर्थिक आधारच न उरल्याने आता त्यांच्यावर वृद्धाश्रमात जाऊन राहण्याची वेळ आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.



दिल्लीतून आरोपीला अटक


महिलेच्या तक्रारीनंतर विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तांत्रिक तपास (Technical Investigation) सुरू केला. तपासादरम्यान आरोपीचे लोकेशन दिल्लीत असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांच्या पथकाने दिल्ली गाठून अनुज तिवारीला अटक केली. तो मूळचा उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील असून वेगवेगळी नावे वापरून महिलांना जाळ्यात ओढत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.



देशभरातील महिलांना गंडा घातल्याचा संशय


प्राथमिक चौकशीत आरोपीने महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये अशाच प्रकारे अनेक महिलांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. मॅट्रिमोनियल संकेतस्थळांवर (Matrimonial Websites) सोबतीच्या शोधात असलेल्या किंवा एकट्या राहणाऱ्या महिलांना लक्ष्य करणे ही त्याची कार्यपद्धती असल्याचा पोलिसांचा संशय आहे. आणखी किती महिलांची फसवणूक झाली आहे, याचा तपास सुरू आहे.



पोलिसांचे आवाहन



सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत असून विष्णूनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मॅट्रिमोनियल संकेतस्थळ (Matrimonial Website) किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून अशाच प्रकारे फसवणूक झालेल्या महिलांनी न घाबरता पुढे येऊन पोलिसांकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन विष्णूनगर पोलिसांनी केले आहे.

Comments
Add Comment

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन

Gold Rate Today : आनंदाची बातमी ! सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचे भावही उतरले

Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात गुरुवार, 15 ऑक्टोबर रोजी मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून

Durga Puja 2026 : नवरात्रीचा उत्साह अन् दुर्गेचा जागर! जाणून घ्या दुर्गापूजेचे संपूर्ण वेळापत्रक, धार्मिक महत्त्व आणि मुख्य विधी

हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि मुख्य सणांपैकी एक असलेल्या दुर्गापूजा (Durga Puja) उत्सवाला सुरुवात होत आहे. वाईटावर

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

IND vs WI: हैदराबाद टी20 पराभवातून टीम इंडियाने घेतला धडा, पुढचा सामना कसा जिंकणार ते श्रेयस अय्यरने सांगितलं

भारतीय संघाला टी20 मालिकेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा पेपर थोडा कठीण गेला आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला

Nashik Crime : बसस्थानकातील चोऱ्यांचा पर्दाफाश ! 24 लाख 43 हजारांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त ; आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Nashik Crime : नाशिक शहरातील बसस्थानक परिसरात चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला गुन्हेशाखा युनिट क्रमांक १च्या पथकाने