Satara Accident : पालखीचे दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; नेमकं काय घडलं?

सातारा : सातारा-पुसेगाव मार्गावर (Satara-Pusegaon Road) शुक्रवारी (१७ जुलै) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फॉर्च्युनर (Fortuner) आणि बोलेरो (Bolero) या दोन चारचाकी वाहनांमध्ये (Four-wheeler) समोरासमोर भीषण धडक (Head-on Collision) झाली. या अपघातात (Accident) ज्ञानोबा माऊलींच्या पालखी (Palkhi) सोहळ्याचे दर्शन घेऊन परतणाऱ्या १० वारकरी (Warkari) महिला जखमी झाल्या. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी (Casualty) झालेली नाही.


मिळालेल्या माहितीनुसार, पुसेगाव हद्दीतील कृष्णकुंज रोपवाटिका आणि हॉटेल रत्नदीपसमोर साताऱ्याकडून पुसेगावकडे जाणारी फॉर्च्युनर आणि पुसेगावहून साताऱ्याकडे येणारी बोलेरो यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्यावर उलटली. या अपघातात बोलेरोमधून प्रवास करणाऱ्या संवादे गावातील १० महिला जखमी झाल्या.



जखमी झालेल्या सर्व महिला फलटण तालुक्यातील सोळ येथे ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्याचे दर्शन घेऊन आपल्या गावी परतत होत्या. दरम्यान, फॉर्च्युनरमध्ये (Fortuner) तीन जण प्रवास करत होते. त्यापैकी एक जण जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे.


अपघाताचा मोठा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बोलेरोमध्ये अडकलेल्या जखमी महिलांना सुरक्षित बाहेर काढून उपचारांसाठी (Treatment) जवळच्या रुग्णालयात (Hospital) दाखल केले. या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. स्थानिकांकडून जखमींना वेळेत मदत मिळाल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले.

Comments
Add Comment

Latur Blast : लातूरमध्ये कुरिअरच्या टेम्पोत भीषण स्फोट; एक जण गंभीर जखमी, वाहनात बंदूक आढळल्याने खळबळ

Latur News: लातूर शहरात कुरिअरची पार्सल घेऊन आलेल्या एका टेम्पोमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. कुरिअरचे

त्र्यंबकेश्वर कुशावर्त तीर्थावर सिंहस्थ धार्मिक विधींना प्रारंभ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजा

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम पार पडत आहे.

Pune News: ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी! PMPML बस प्रवासात 50 टक्के सवलत; 1 नोव्हेंबरपासून नवा निर्णय लागू

Pune News: पुणे,

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला बारा वर्षे पूर्ण; राजकारणातील एक तप आणि विकासाचा नवा अध्याय!

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वानखेडे स्टेडियमवरील ऐतिहासिक शपथविधीला ३१ ऑक्टोबर,

Cm Devendra Fadanvis News: राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय! चारा परराज्यात पाठविण्यास बंदी...

मुंबई: राज्यातील चारा परराज्यात पाठवण्यावर कायदेशीर बंदी घालण्यात आली असून, चाऱ्याचा वापर बायोफ्युएल किंवा

Pankaja Munde : चारा टंचाईवर मात करण्यासाठी 5 टक्के निधीची तरतूद, राज्य सरकारचा कृती आराखडा जाहीर

मुंबई: अल-निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण घटल्याने राज्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.