Supriya Sule : सुप्रिया सुळे... शांत रहा!

डॉक्टरांचा सल्ला; पुढील काही काळ भाषणे, मुलाखतींपासून दूर



मुंबई(Mumbai) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांना घशाच्या त्रासामुळे डॉक्टरांनी आवाजाला पूर्ण विश्रांती देण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आगामी काही काळ त्या जाहीर भाषणे, राजकीय सभा आणि माध्यमांमधील मुलाखतींपासून दूर राहणार आहेत. सुळे यांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे यासंदर्भात माहिती दिली असून, पुढील एक ते दोन आठवडे त्या बोलणे पूर्णपणे टाळणार आहेत.(Supriya Sule)



खासदार सुप्रिया सुळे या राज्यातील विविध राजकीय घडामोडींवर पक्षाची बाजू मांडण्यासाठी आणि जनसंवादासाठी सातत्याने सक्रिय असतात. मात्र, घशाचा त्रास उद्भवल्यामुळे त्यांना आता सार्वजनिक व्यासपीठांवरून काही काळ दूर राहावे लागणार आहे. आपल्या प्रकृतीविषयी माहिती देताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, त्यांनी घसा आणि आवाजाच्या तपासणीसाठी प्रसिद्ध डॉक्टर मिलिंद किर्तणे यांची भेट घेतली होती. तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांच्या घशात सूज असल्याचे सांगत आवाजाला पूर्ण विश्रांती देण्याचा सल्ला दिला आहे.(Doctor)



डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार सुप्रिया सुळे या पुढील उपचारांचा भाग म्हणून व्हॉईस थेरपी घेणार आहेत. प्रकृतीत सुधारणा होईपर्यंत, म्हणजेच पुढील एक ते दोन आठवडे त्या कोणत्याही जाहीर कार्यक्रमात भाषणे करणार नाहीत, तसेच प्रसारमाध्यमांना मुलाखती देणे किंवा दीर्घकाळ बोलणे टाळणार आहेत. दरम्यान, २० जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे अधिवेशन काळात पहिले दोन आठवडे सुप्रिया सुळे मौन दिसतील.

Comments
Add Comment

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

मंत्रोच्चाराच्या घोषात त्र्यंबकेश्वर येथे विधिवत ध्वजस्तंभ पूजन, 31 फूट उंच भव्य ध्वजस्तंभाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पूजन; पाहा खास क्षण

[caption id="attachment_1066607" align="aligncenter" width="800"] त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विधिवत

सचिन सानप शिवसेनेचा उमेदवार नाही! उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

मुंबई : पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीत समन्वयाचा अभाव दिसत असताना, उद्योगमंत्री उदय सामंत

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन