Raigad Crime : रायगड जिल्ह्यातून ६.९९६ किलो चरस जप्त

रायगड : अमली पदार्थांविरोधात श्रीवर्धन पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ३५ लाख १८ हजार रुपयांचा चरस जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत ६.९९६ किलो चरस, मोटारसायकल आणि मोबाईल असा मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. (Raigad Crime)


पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने १८ जुलै रोजी शेखाडी परिसरातील कोंडोवली स्मशानभूमीजवळ सापळा रचला. त्यावेळी मोटारसायकलवरून येणाऱ्या सादिक इब्राहिम शेखवडे (वय ६३, रा. शेखाडी) याला संशयावरून ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान त्याच्याकडून २.१४६ किलो चरस जप्त करण्यात आला. त्याची किंमत सुमारे १० लाख ७३ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Raigad Crime)



अधिक चौकशीत आरोपीने शेखाडी येथील बंद फायरवूड बोळीत आणखी चरस लपवून ठेवल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष कारवाई करत ४.८५० किलो अतिरिक्त चरस जप्त केला. या साठ्याची किंमत २४ लाख २५ हजार रुपये असल्याचे निष्पन्न झाले. (Raigad Crime)



या कारवाईत एकूण ६.९९६ किलो चरस, एक मोटारसायकल व एक मोबाईल असा ३५ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध श्रीवर्धन पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप राठोड करीत आहेत. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील अमली पदार्थ तस्करीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. (Raigad Crime)

Comments
Add Comment

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

Kanya Pujan 2026: कन्या पूजनसाठी 9 कन्या मिळाल्या नाही तर काय करायचं? काय सांगतं शास्त्र

शारदीय नवरात्री सुरू असून देवीच्या नऊ रुपांची मोठ्या भक्तिभावाने पूजन केलं जात आहे. या दरम्यान कन्या पूजनचं

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी