PM Narendra Modi : विद्यार्थ्यांबाबत सरकार संवेदनशील, नीट पेपर लीक प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कठोर भूमिका

नवी दिल्ली : नीट परीक्षा आणि पेपर लीक प्रकरणावरून विरोधकांच्या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या संसद मार्चनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या मुद्द्यावर पहिलेच वक्तव्य समोर आले आहे. एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले की, सरकार देशातील युवकांच्या भविष्याशी अजिबात खेळ होऊ देणार नाही आणि पेपर लीकच्या दोषींना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले की, पेपर लीक हा राजकारणाचा विषय नसून तो देशाच्या तरुणांच्या भविष्याशी जोडलेला संवेदनशील विषय आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणूनच सरकारने तातडीने पावले उचलत पुनर्परीक्षा घेतली आणि ती यशस्वीपणे पूर्ण करून निकाल जाहीर करण्यात कोणताही विलंब केला नाही. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी मंगळवारी पार पडलेल्या एनडीए संसदीय पक्षाच्या 'मंगल मिलन' बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पंतप्रधानांच्या या भूमिकेची माहिती दिली.



पक्षीय राजकारणापलीकडील विषय


पेपर लीकची बातमी समोर येताच सरकारने क्षणाचाही विलंब न करता तात्काळ कारवाई केली आणि या प्रकरणात १३ जणांना अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी केली. पेपर लीकच्या धंद्यात लिप्त असलेल्या आणि दोषी आढळलेल्यांना कठोर शासन मिळवून देण्यासाठी सर्वोच्च दर्जाच्या वकिलांनी सहकार्य करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. जेणेकरून असे पापकृत्य करणाऱ्यांना कठोर शिक्षा होईल. हा विषय केवळ केंद्र सरकारचा किंवा एका राज्याचा नसून संपूर्ण देशाचा आहे. देशातील ज्या-ज्या राज्यांत अशा प्रकरणांमध्ये लोक गुंतले आहेत, त्यांना शिक्षा देण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. भविष्यात पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी अत्यंत कडक पावले उचलली जात असून, एक दोषरहित परीक्षा यंत्रणा तयार करण्यासाठी सर्वांनी मिळून काम केले पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले.



धरणे आंदोलन संपवण्याचे आवाहन


या आंदोलनादरम्यान, 'कॉकरोच जनता पार्टी'चे प्रतिनिधी सौरव दास आणि आशुतोष राकां यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये दोन फेऱ्यांमध्ये चर्चा झाली. मंत्री जे. पी. नड्डा यांनी आंदोलकांना धरणे आंदोलन संपवून सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच चर्चेदरम्यान नड्डा यांनी त्यांच्या मागण्या विचारल्या. यावर प्रतिनिधींनी आपल्या मागण्यांची यादी तोंडी सांगितली. त्यावर मंत्र्यांनी मागण्या लिखित स्वरूपात सादर करण्यास सांगितले. त्यानुसार 'कॉकरोच'च्या प्रतिनिधींनी संध्याकाळी ४ वाजता केंद्रीय मंत्र्यांकडे आपल्या मागण्यांचे लिखित पत्र अधिकृतपणे सोपवले.

Comments
Add Comment

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

मंत्रोच्चाराच्या घोषात त्र्यंबकेश्वर येथे विधिवत ध्वजस्तंभ पूजन, 31 फूट उंच भव्य ध्वजस्तंभाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पूजन; पाहा खास क्षण

[caption id="attachment_1066607" align="aligncenter" width="800"] त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विधिवत

सचिन सानप शिवसेनेचा उमेदवार नाही! उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

मुंबई : पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीत समन्वयाचा अभाव दिसत असताना, उद्योगमंत्री उदय सामंत

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन