Railone App : पश्चिम रेल्वेचे प्रवाशांना 'रेलवन' अॅप वापरण्याचे आवाहन

मुंबई : रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, स्मार्ट आणि डिजिटल करण्यासाठी पश्चिम रेल्वेने (Western Railway) प्रवाशांना 'रेलवन' (RailOne) या भारतीय रेल्वेच्या एकात्मिक मोबाईल अॅपचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले आहे. तिकीट बुकिंगपासून ट्रेनचे लाईव्ह लोकेशन, पीएनआर स्टेटस, जेवण ऑर्डर, परतावा (रिफंड) आणि रेल मदत सेवेसह अनेक सुविधा आता एकाच अॅपवर उपलब्ध आहेत. (Railone App)


पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, 'रेलवन' अॅप हे भारतीय रेल्वेचे सिंगल-विंडो डिजिटल प्लॅटफॉर्म असून, विविध सेवांसाठी वेगवेगळी अॅप्स डाउनलोड करण्याची गरज आता राहणार नाही. (Western Railway)



एकाच अॅपवर मिळणार 'या' सुविधा :


'रेलवन' अॅपद्वारे प्रवाशांना आरक्षित तिकीट, अनारक्षित तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट बुक करता येणार आहे. याशिवाय ट्रेन शोधणे, पीएनआर स्टेटस तपासणे, कोचची माहिती मिळवणे, ट्रेनचे लाईव्ह ट्रॅकिंग, जेवण ऑर्डर करणे, रिफंडसाठी अर्ज करणे आणि रेल मदत सेवेद्वारे तक्रार नोंदवणे अशा अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. (Western Railway)



डिजिटल तिकीट बुकिंगवर मिळणार ३ टक्के लाभ :


डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वेने 'रेलवन' अॅपवरून अनारक्षित तिकीट बुक केल्यास ३ टक्के सवलत देण्याची योजना ३१ मार्च २०२७ पर्यंत वाढवली आहे. आर-वॉलेट (R-Wallet) द्वारे पैसे भरल्यास ३ टक्के कॅशबॅक; इतर डिजिटल पेमेंट माध्यमांद्वारे व्यवहार केल्यास ३ टक्के सवलत, ही योजना प्रवाशांना डिजिटल तिकीट प्रणालीकडे वळवण्यासाठी आणि 'रेलवन' अॅपचा वापर वाढवण्यासाठी सुरू ठेवण्यात आली आहे. (Western Railway)



'स्मार्ट रेल्वे प्रवासासाठी रेलवन डाउनलोड करा' :


विनीत अभिषेक यांनी सर्व प्रवाशांना 'रेलवन' अॅप डाउनलोड करून त्यातील सर्वसमावेशक सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. हे अॅप रेल्वेच्या महत्त्वाच्या सेवांसाठी एकाच ठिकाणी डिजिटल सुविधा उपलब्ध करून देत असून, प्रवास अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय रेल्वेच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने 'रेलवन' हे महत्त्वाचे पाऊल मानले जात असून, भविष्यात रेल्वेच्या अधिकाधिक सेवा या एकाच अॅपवर उपलब्ध करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. (Western Railway)


Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर